मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 378 मतदारांपैकी 362 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. तर शिवसेना उबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान केलं नसल्याची माहिती मिळाली होती. हे मतदान पार पडल्यानंतर लगेचच मतमोजणी घेण्यात आली होती.
या मतमोजणी दरम्यान आलेल्या निकालानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत जितेंद्र आव्हाड यांनी नवीन शेट्टी यांचा पराभव केला आहे.त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. एमसीएच्या कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद नार्वेकर यांची नियक्ती झाली आहे. एमसीएच्या सचिव पदी उमेश खानविलकर यांची वर्णी लागली आहे, तर संयुक्त सचिवपदी निलेश भोसले आणि खजीनदार पदी अरमान मलिक निवडून आले आहेत.
advertisement
अजिंक्य नाईक बिनविरोध
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी भाजप नेते प्रसाद लाड, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विंहग सरनाईक यांनी अर्ज केला होता.पण निवडणूकीच्या दोन दिवस आधीच सर्वच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांनी बिनविरोध निवड झाली होती.
एमसीए निवडणूकीचा अंतिम निकाल
शरद पवार पॅनल विजय उमेदवार
जितेंद्र आव्हाड -उपाध्यक्ष
उमेश खानविलकर - सचिव
निलेश भोसले - सहसचिव
अरमान मलिक- खजिनदार (आशिष शेलार पॅनल)
कौन्सिल मेंबर
प्रदीप गुप्ता
केनी भारत सचिदानंद
अपेक्स कौन्सिल मेंबर
विघ्नेश कदम
नदीम मेनन
मिलिंद नार्वेकर
विकास रेपाळे
भूषण पाटील
आशिष शेलार पॅनल (विजय उमेदवार)
प्रमोद यादव
सुरज सामंत
संदीप विचारे
नील सावंत
