रोहितने केक खाल्लाच नाही
टीम इंडियाचा हिटमॅन सध्या अफलातून कामगिरी करताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितने 10 किलो वजन देखील कमी केलं होतं. अशातच रोहित आता डाएटवर असल्याचं पहायला मिळत आहे. रोहित शर्माने त्याचा आवडता केक देखील खायचं सोडून दिलंय. टीम इंडिया जेव्हा हॉटेलमध्ये जात होती, तेव्हा जयस्वालने हट्ट करून देखील रोहितने केक खाल्लाच नाही. तर विराटने जयस्वालसाठी आपला डाएट मोडला.
advertisement
विराटने जयस्वालसाठी डाएट प्लॅन मोडला
टीम इंडिया हॉटेलवर पोहोचली, तेव्हा विराट आणि जयस्वालसाठी केकचं आयोजन केलं गेलं होतं. त्यावेळी विराटने जयस्वालच्या हातात चाकू दिला अन् त्याला केक कापण्यास सांगितलं. त्यावेळी हॉटेल मालकाने शॅम्पेनचं आयोजन देखील केलं होतं. पण कुणीच घेत नाही, असं विराट म्हणाला. जयस्वालने केक कट केला अन् विराटला भरवला. विराटने जयस्वालसाठी डाएट प्लॅन मोडला. त्यानंतर जयस्वाल रोहितकडे वळाला पण...
मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई
रोहित भाई थोडासा केक घे ना म्हणत यशस्वीने हिटमॅनला केक भरवण्याचा प्रयत्न केला पण रोहित चार हात लांबच थांबला अन् पळाला. मोटा हो जाऊंगा, नहीं चाहिये भाई, असं म्हणत रोहितने थेट आपल्या रुमकडे धाव घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
टी-ट्वेंटी मालिका
दरम्यान, यशस्वी जयस्वालच्या शतकामुळे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 विकेट्सने विजय मिळवला. आता टीम इंडिया साऊथ अफ्रिकाविरुद्ध पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका खेळणार आहे.
