पलाशच्या आईने दिली गुड न्यूज
विमानतळावर पलाश दिसल्यानंतर त्याच्याकडून कोणताही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. पलाश शांततेच एअरपोर्टवरून जाताना दिसला. त्यामुळे आता पलाश आणि स्मृती यांच्यात सगळं अलबेल आहे का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता पलाशच्या आईने गुड न्यूज दिली आहे, ज्यामुळे स्मृतीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.
advertisement
स्वागतासाठी तयारी केली होती
हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अमिता मुच्छल यांनी गुड न्यूज दिली. स्मृती मानधना आणि पलाश दोघंही सध्या कठीण काळातून जात आहेत. पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मी देखील तिच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सगळं ठीक होईल, असा विश्वास पलाशच्या आईने व्यक्त केला. आणि दोघांचं लग्न खूप लवकर होईल, असंही पलाशची आई म्हणाली आहे.
लग्नाची नवी तारीख काय?
दरम्यान, स्मृती आणि पलाशच्या लग्नाची नवी तारीख काय? असा सवाल विचारला जात आहे. स्मृतीने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांचे सर्व फोटो आणि व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून डिलीट केले होते, त्यामुळे स्मृतीचं अन् पलाशचं लग्न मोडलं की काय? अशी चिंता चाहत्यांना लागली होती. अशातच आता स्मृती अन् पलाश लवकर लग्नबंधनात अडकणार आहेत.
