रणजी ट्रॉफीच्या इलाईट 2025-26 स्पर्धेत कर्नाटक आणि केरला संघात सामना सूरू आहे. या स्पर्धेत कर्नाटककडून खेळताना टीम इंडियाचा फलंदाज करून नायरने नाबाद शतकीय खेळी केली आहे. नायरच्या बॅटीतून ही शतकीय खेळी तेव्हा आली जेव्हा कर्नाटक संघाचे दोन्ही सलामीवीर फ्लॉप ठरले होते. त्यावेळी त्याने कर्नाटकचा डाव सावरून नाबाद खेळी केली आहे.
advertisement
कर्नाटककडून कर्णधार मयंक अग्रवाल आणि अनीश दोघेही सलामीला उतरले होते.मात्र दोघेही अग्रवाल 5 आणि अनीश 8 धावा करून बाद झाले होते.या दोन विकेट पडल्यानंतर कृष्णन श्रीजीत आणि करून नायर फलंदाजीला उतरले होते. यावेळी दोघांनी कर्नाटकचा डाव सारवला होता.पण कृष्णन श्रीजीत 65 वर आऊट झाला. त्यानंतर करून नायर 119 धावांवर नाबाद खेळतो आहे. त्याच्यासोबत मैदानात स्मरण रविचंद्रन 67 धावांवर नाबाद खेळतो आहे. दरम्यान बातमी लिहेपर्यत कर्नाटकने पहिल्या डावात 3 विकेट गमावून 274 धावा केल्या आहेत.त्यामुळे आता कर्नाटक किती धावांपर्यंत मजल मारते ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
गोवा विरूद्ध 174 धावांची नाबाद खेळी
दरम्यान याआधी करूण नायरने गोवा संघाविरूद्ध पहिल्याच रणजी सामन्यात 174 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत. करूण नायरचे हे रणजी स्पर्धेतल सलग दुसरं शतक आहे.त्यामुळे त्याच्या खेळीने त्याने पुन्हा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान करूण नायरला इंग्लंड विरूद्ध मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती.मात्र पाचही सामन्यात तो मोठ्या धावा करू शकला नव्हता.त्यामुळे वेस्ट इंडिज विरूद्ध टेस्ट मालिकेतून त्याचा पत्ता कट करण्यात आला होता. पण आता त्याची रणजी सामन्यातील कामगिरी पाहता तो आता नोव्हेंबर पार पडणाऱ्या साऊथ आफ्रिकेविरूद्ध टेस्ट मालिकेत त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. आता त्याला खरंच संधी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
