मुंबईकडून प्रथम फलंदाजीसाठी आयुष म्हात्रे आणि अजिंक्य रहाणे उतरले होते. पण मुंबईची सूरूवात चांगली झाली नव्हती.कारण सलग दोन शतक ठोकणारा आयुष म्हात्रे आजच्या सामन्यात अवघ्या 21 धावा करून बाद झाला होता. त्याच्यानंतक अजिक्य रहाणे आणि सरफराज खानने मुंबईचा डाव सावरला होता.
अजिंक्य रहाणेने या दरम्यान 42 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर सुर्यकुमार यादव मैदानात आला, पण तो 20 धावा करून बाद झाला. त्याच्या पाठोपाठ सुर्यांश शेडगेने अवघ्या 9 धावा केल्या. आणि शेवटी साईराज पाटीलने 9 बॉलमध्ये 25 धावा काढल्या. शेवटी सर्फराज खान 100 धावा करून नाबाद राहिला होता.यावेळी सर्फराजने 7 षटकार आणि 8 चौकार मारले होते. या दरम्यान सर्फराज खानचा स्ट्राईक रेट 212 होता.
सर्फराज खानच्या या शतकीय खेळीच्या बळावर मुंबईने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या आहेत.त्यामुळे आसामसमोर 221 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना आसामचा डाव गडगडला आहे. आसामकडून सिबसंकर रॉयने सर्वांधिक 41 धावांची खेळी केली होती.
