TRENDING:

Sikander Sheikh : 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक, पैलवानाकडे काय काय सापडलं? कुख्यात टोळीशी संबंध काय?

Last Updated:

Sikander Sheikh Arrested : पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Sikander Sheikh Arrested : महाराष्ट्रातील कुस्तीची आवड असलेल्या लहान पोरांच्या आणि कुस्तीप्रेमींच्या गळ्याती ताईत म्हणजेच पैलवान सिकंदर शेख याला अटक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सिंकदर शेख याला महाराष्ट्रातून नव्हे तर पंजाबमध्ये अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा प्रसिद्ध कुस्तीपटू, रुस्तम ए हिंद, महाराष्ट्र केसरी अशी सिंकदरची ओळख होती. अशातच आता सिंकदरला एअरपोर्टवरून अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
Sikander Sheikh Arrested
Sikander Sheikh Arrested
advertisement

सिकंदरजवळ काय काय सापडलं?

पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे, स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही या दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. तर सिकंदरच्या कुटुंबियांनी आरोप फेटाळून लावले असून सिंकदर निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

advertisement

24 ऑक्टोबर रोजी काय घडलं?

सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी आम्ही संपर्क साधल्याची माहिती एसएसपी हरमन हंस यांनी दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी एक्सयूव्ही गाडीत दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते. या दोघांनी शस्त्रे सिकंदर शेखकडे दिली त्यानंतर सिकंदरने ती नयागावातील कृष्ण उर्फ हैप्पी याला पुरवायची होती. त्यावेळी पोलिसांनी एअरपोर्ट चौकातून तिघांना अटक केली. तर 26 ऑक्टोबर रोजी कृष्ण कुमार उर्फ हैप्पी यालाही अटक करण्यात आली आहे.

advertisement

सिकंदर शेखला रोल काय होता?

अटक केलेल्या तिघांकडून आणखी तीन पिस्तुल जप्त करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांच्या मते सिंकदर शेख शस्त्र पुरवठा साखळीत मध्यस्थाची भूमिका बजावत होता. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी कोण कोणते धागेदोरे मिळतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोण आहे सिकंदर शेख?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

दरम्यान, सिकंदर शेख हा गरीब कुटुंबातून आलेला आणि लाल मातीत कुस्ती मारत एक नावाजलेला मल्ल आहे. देशभरातील मानाच्या कुस्त्यांच्या मैदानात मोठमोठ्या मल्लांना चितपट करत सिंकदरने नाव कमावले. त्याने 2024 चा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकण्याचाही पराक्रम केला. त्यापाठोपाठ रुस्तम ए हिंद केसरीची गदाही उंचावली. म्हणूनच सिकंदर शेख कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत मानला जातो.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikander Sheikh : 'महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक, पैलवानाकडे काय काय सापडलं? कुख्यात टोळीशी संबंध काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल