TRENDING:

Smriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न होणार का नाही? वादळ शमल्यानंतर मानधनाच्या भावाची पहिली रिएक्शन

Last Updated:

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाभोवतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. स्मृती मानधनाचा भाऊ श्रवण मानधना याने पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाभोवतीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मानधना आणि पलाश यांचे लग्न गेल्या महिन्यात 23 नोव्हेंबर रोजी होणार होते, पण ते अचानक पुढे ढकलण्यात आले. आता, सोशल मीडियावर लग्नाची नवीन तारीख फिरत आहे. व्हायरल पोस्टनुसार, मानधना आणि पलाश यांचे लग्न 7 डिसेंबर रोजी होणार आहे. लग्नाच्या या नव्या तारखांच्या चर्चांवर मानधना कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
स्मृती-पलाशचं लग्न होणार का नाही? वादळ शमल्यानंतर मानधनाच्या भावाची पहिली रिएक्शन
स्मृती-पलाशचं लग्न होणार का नाही? वादळ शमल्यानंतर मानधनाच्या भावाची पहिली रिएक्शन
advertisement

मानधना आणि पलाश गेल्या महिन्यात 20 नोव्हेंबरपासून त्यांच्या लग्नाची तयारी करत होते. लग्न 23 नोव्हेंबर रोजी सांगलीमध्ये होणार होते, पण ते अचानक पुढे ढकलण्यात आले. लग्न पुढे ढकलण्याचे अधिकृत कारण मानधना यांच्या वडिलांची बिघडलेली प्रकृती होती. पण, त्यानंतर, सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले गेले, ज्यात पलाश मुच्छलने स्मृतीला धोका दिल्याने लग्न झालं नाही, असा दावाही केला गेला.

advertisement

पलाश मुच्छलवर आरोप

लग्न पुढे ढकलल्यानंतर, पलाश मुच्छल याचे नाव पहिले मेरी डि'कोस्टा नावाच्या कोरिओग्राफरशी जोडले गेले. मेरीसोबतचे पलाशचे कथित चॅट्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले, पण मेरीने हे चॅट्स आपले नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. यानंतर पलाशचे नाव नंदिका द्विवेदी आणि गुलनाज खान नावाच्या महिलांसोबतही जोडलं गेलं. या संपूर्ण घटनाक्रमानंतर पलाशलाही धक्का बसला आणि तब्येत बिघडल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा पलाश-स्मृतीच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

advertisement

स्मृतीच्या भावाची प्रतिक्रिया

लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर पलाश मुच्छल पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला. याव्यतिरिक्त, सोशल मीडियावर असे दावे करण्यात येत आहेत की पलाश आणि स्मृती या महिन्यात 7 डिसेंबर रोजी जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत लग्न करणार आहेत. स्मृती मानधानाच्या भावाने व्हायरल होणाऱ्या लग्नाच्या नवीन तारखेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना, स्मृतीचा भाऊ श्रवण मंधाना म्हणाला, 'मला लग्नाच्या नवीन तारखेबद्दल काहीही माहिती नाही. सध्या तरी लग्न पुढे ढकलण्यात आले आहे.' स्मृतीच्या भावाच्या विधानावरून स्पष्ट होते की पलाश किंवा स्मृतीच्या कुटुंबाने अधिकृतपणे लग्नाच्या तारखेची पुष्टी केलेली नाही, त्यामुळे व्हायरल होत असलेल्या लग्नाच्या तारखा या अफवा आहेत, असंच म्हणावं लागेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Smriti Mandhana : स्मृती-पलाशचं लग्न होणार का नाही? वादळ शमल्यानंतर मानधनाच्या भावाची पहिली रिएक्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल