किंग कोहलीने रील व्हायरल
अर्शदीप सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि अनेक मीम्स शेअर करतो. यावेळी त्याने विराट कोहलीसोबत एक मीम बनवण्याचा प्रयत्न केला, पण किंग कोहलीने रीलमध्ये त्याला असे काही सांगितले ज्यामुळे अर्शदीपच्या अंगलट आली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेमकं काय झालं? पाहा
advertisement
आज शतक तर निश्चित होतं...
विराट पाजी, आज रन्स कमी होत्या, नाहीतर आज शतक तर निश्चित होतं, असं अर्शदीप म्हणताना दिसला. त्यावर विराटने काहीही विचार न करता अर्शदीपला रोस्ट केलं. विराटने एका वाक्यात विषय संपवला. बेटा आज नशिबाने टॉस जिंकलो, नाहीचर दवामुळे तुझंही शतक झालं असतं, असं विराट कोहली म्हणाला.
विराट कोहली काय म्हणाला?
खरं सांगायचं तर, या मालिकेत मी ज्या पद्धतीने खेळलो आहे ती माझ्यासाठी सर्वात समाधानकारक गोष्ट आहे. गेल्या २-३ वर्षात मी या पातळीवर खेळलो आहे असे मला वाटत नाही. मला माहित आहे की जेव्हा मी मध्यभागी अशी फलंदाजी करू शकतो तेव्हा ते निश्चितच संघाला खूप मदत करते कारण मी बराच काळ फलंदाजी करू शकतो, मी परिस्थितीनुसार फलंदाजी करू शकतो, असं विराट कोहली मॅचनंतर म्हणाला.
