अर्शिन कुलकर्णीला खणखणीत सिक्स
वैभवने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर बिहारकडून महाराष्ट्राविरुद्ध इनिंगची सुरुवात केली आणि फक्त 58 बॉलमध्ये आपलं शतक पूर्ण केलं. त्याने आपल्या या शानदार पारीत 7 फोर आणि 7 सिक्स मारून 100 रन पूर्ण केले. वैभवने 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारून आपले शतक पूर्ण केले. ही ओव्हर अर्शिन कुलकर्णीने टाकली होती. त्याने एकूण 60 बॉलमध्ये नाबाद 108 रन केले.
advertisement
चौथ्या विकेटसाठी 75 रनची पार्टनरशिप
वैभवच्या शतकीय खेळीनंतरही बिहारचा स्कोर तीन विकेटच्या नुकसानीवर केवळ 176 रनपर्यंतच पोहोचू शकला. इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या या स्टारने आयुष लोहारुकासोबत चौथ्या विकेटसाठी 75 रनची पार्टनरशिप केली. आयुष लोहारुकाने 17 बॉलमध्ये नाबाद 25 रन केले. महाराष्ट्राकडून अर्शिन, राजवर्धन हंगरगेकर आणि विक्की ओस्तवाल यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
वैभवने सर्वांची तोंडं केली बंद
दरम्यान, अलीकडील रायझिंग स्टार्स आशिया कपमध्येही सूर्यवंशीची बॅट तळपली. वैभवने युएईविरुद्ध 42 बॉलमध्ये 144 रन केल्या, यात त्याने 11 फोर आणि 15 सिक्स मारले. पण, भारताच्या स्थानिक टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट पूर्णपणे शांत होती. अशातच शतक ठोकून वैभवने सर्वांची तोंडं बंद केली आहेत.
