गुजरातचा उर्वील पटेल आणि पंजाबच्या अभिषेक शर्माने 2024 च्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 28 बॉलमध्ये शतकं झळकावली होती. तर ऋषभ पंतने 2018 साली 32 बॉलमध्ये शतक केलं होतं. वैभव सूर्यवंशीचं हे शतक टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीयाने ठोकलेलं पाचवं सगळ्यात जलद शतक आहे.
टी-20 मध्ये सर्वाधिक स्कोअर करणारे भारतीय
तिलक वर्मा- 151 रन
advertisement
श्रेयस अय्यर- 147 रन
पुनित बिष्त- 146 रन, नाबाद
वैभव सूर्यवंशी- 144 रन
टी-20 मधील पाचवं जलद शतक
साहिल चौहान- 27 बॉल
उर्वील पटेल- 28 बॉल
अभिषेक शर्मा- 28 बॉल
मुहम्मद फहाद- 29 बॉल
क्रिस गेल- 30 बॉल
ऋषभ पंत- 32 बॉल
वैभव सूर्यवंशी- 32 बॉल
14 वर्ष आणि 232 दिवसांचा असताना वैभव सूर्यवंशीने हे शतक ठोकलं आहे. सीनियर क्रिकेटमध्ये देशाकडून खेळत असताना सगळ्यात लहान वयात केलेलं हे शतक आहे. याआधी बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमच्या नावावर हा विक्रम होता, जेव्हा त्याने 16 वर्ष आणि 171 दिवसांचा असताना नाबाद 111 रनची खेळी केली होती. बांगलादेश ए कडून खेळताना मुशफिकुरने झिम्बाब्वे ए विरुद्ध 2005 च्या प्रथम श्रेणी सामन्यात हा विक्रम केला.
या सामन्यात पहिल्याच बॉलला वैभव सूर्यवंशीचा कॅच फिल्डरने सोडला, पण या जीवदानाचा वैभवने पुरेपूर फायदा उचलला. या इनिंगमध्ये त्याने 342.85 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत 11 फोर आणि 15 सिक्स मारले. पुरुषांच्या टी-20 क्रिकेटमध्ये एवढ्या स्ट्राईक रेटने 100 करणारा वैभव चौथा खेळाडू ठरला आहे.
वैभव सूर्यवंशीचं टी-20 फॉरमॅटमधलं हे दुसरं शतक आहे. याआधी आयपीएल 2025 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना 35 बॉलमध्ये सेंच्युरी केली होती. आयपीएल इतिहासात सगळ्यात लहान वयात शतक करण्याचा विक्रमही वैभव सूर्यवंशीने केला होता. तसंच आयपीएलमधलं वैभवचं ते दुसरं सगळ्यात जलद शतक होतं. आयपीएलमधल्या सगळ्यात जलद शतकाचा विक्रम क्रिस गेलच्या नावावर आहे. 2011 साली पुणे वॉरियर्सविरुद्ध गेलने 30 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.
वैभव सूर्यवंशीच्या या तडाखेदार खेळीमुळे इंडिया ए ने 4 विकेट गमावून 297 रन केले. टी-20 फॉरमॅटमधला हा संयुक्तरित्या पाचवा सर्वाधिक स्कोअर आहे. इंडिया ए चा कर्णधार जितेश शर्माने 32 बॉलमध्ये 83 रनची खेळी केली.
