गौतमची बीसीसीआयसोबत बैठक?
काही मीडिया रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समिती प्रमुख अजित आगरकर आणि इतर अनेक अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावल्याची माहिती काही मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती. टीम इंडियाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्याबद्दल सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. दोघेही गेल्या काही सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी करून फॉर्ममध्ये परतले आहेत.
advertisement
प्रज्ञान ओझाची एअरपोर्टवर एन्ट्री
अशातच आता रांची एअरपोर्टवर टीम इंडिया रायपूरसाठी रवाना होत असताना टीम इंडियाचा नॅशनल सिलेक्टर प्रज्ञान ओझा याने भारतीय खेळाडूंची भेट घेतली. गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यासह त्याने खास बोलणं केलं. यावेळी विराट कोहलीसोबत त्याची गंभीर चर्चा झाल्याचं पहायला मिळालं. तसेच गंभीरसोबत देखील त्याचं बोलणं झाल्याचं पहायला मिळालं.
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये वाद?
दरम्यान, रांचीमधल्या वनडेनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधले काही फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि कोच गौतम गंभीर यांच्यात वाद असल्याच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत. शतक केल्यानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये आला त्यानंतर गंभीरने त्याला मिठी मारली, पण दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य दिसलं नाही. त्यामुळे अनेकांच्या भूवया देखील उंचावल्या आहेत.
