मीरा रोडच्या काशिमीरा परिसरात 30 नोव्हेंबर रोजी रात्री लग्न समारंभातून सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करण्यात आले. लग्न समारंभात नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्ताने सर्व नातेवाईक आणि ओळखीचे मित्र मंडळी उपस्थित होते. एवढ्या गर्दीचा फायदा उचलत तरूणाने सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केले आहे. त्याचं झालं असं, काशिमीरामध्ये 30 नोव्हेंबर रोजी एक लग्न सोहळा होता. त्या सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेत 25 वर्षीय तरूणाने आईस क्रीमच्या बहाण्याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले आहे.
advertisement
सुरज तिवारी नावाच्या नराधमाने सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आईसक्रीम खाऊ घालण्याच्या बहाण्याने पळवून नेत तिच्या अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. जवळच असलेल्या एका मैदानामध्ये नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न त्या तरूणाने केला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्या नराधमाविरोधात बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत काशिमीरा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपी सुरज तिवारी (रा. रावळपाडा, दहिसर पूर्व) याला अटक केली आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजीवनी सोलनकर करत आहेत.
