रागात घडला गंभीर गुन्हा
ठाणे शहरातील कॅसल मिल परिसरात 3 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. जिथे पीडित व्यक्ती मनोहर मोरे त्याच्या मित्रांसोबत उभा होता त्याच दरम्यान आरोपी हेमंत कडव त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केले. हल्ला इतक्या अचानक झाला की तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर मनोहरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. जिथे त्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
advertisement
पोलिसांनी हल्ल्याची माहिती मिळताच राबोडी पोलिस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल केला असून आरोपी हेमंत कडव याचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी साक्षीदारांची माहिती घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासात घेतले आहेत.
हल्ल्याच कारण काय?
हल्ल्याचे कारण म्हणजे फक्त सोबत येण्यास नकार देणे होते. पण यात धारदार ब्लेडचा वापरुन एखाद्यावर वार करणे ही अत्यंत भयानक आणि धक्कादायक बाब आहे. या घटनेमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले असून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
