दररोजप्रमाणे शाळेसाठी निघाली पण परतलीच नाही
मिळालेल्या माहितीनुसार, वागळे इस्टेटमधील काजूवाडी भागात अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. दररोज प्रमाणे ८ नोव्हेंबर रोजी मुलीने शाळेची तयारी केली त्यानंतर तिच्या वडिलांनी तिला साधारण ८ वाजता किसननगर येथील तिच्या शाळेत सोडले आणि वडील तेथून परत घरी निघून गेले.
advertisement
शिक्षकांनी घरी फोन केला आणि समोर आलं धक्कादायक वास्तव
वडिलांनी मुलीला शाळेत सोडले आणि ते घरी निघून गेले. पण काही वेळात मुलगी वर्गात न दिसल्यास तिच्या शिक्षकांनी याची माहिती लगेच पालकांना दिली आणि त्यांच्या पायाखालची जमिन सरकरली. कारण वडिलांनी मुलीला शाळेत सोडले पण ती शाळेत नसल्याने तिच्या पालकांमध्ये टेंशनमध्ये आले. त्यानंतर त्यांनी तिच्या शाळेत धाव घेतली आणि मुलीच्या मित्र-मैत्रिणींच्या साह्याने पालकांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळच्या भागात शोध घेतला, परंतु त्याला यश आले नाही.
सकाळी गेलेली मुलगी बराच वेळ घरी न आल्याने आणि शाळेतही न पोहचल्याने पालकांना अपहरण झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी अखेर 9 नोव्हेंबर रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला. सध्या पोलिस या घटनेच्या चौकशीसाठी विविध पोलिसांचे पथक तयार केले आहेत. त्यात मुलीच्या शाळेतील शिक्षक, मित्र, शेजारी आणि आसपासच्या लोकांकडून माहिती गोळा केली जात आहे. अपहरण करणाऱ्याचा उद्देश काय होता आणि मुलीचा पुढे काय झाला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
या घटनेच्या तपासासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, आसपासच्या भागातील चौकशी, तसेच संभाव्य साक्षीदारांची माहिती घेत आहेत शिवाय मुलीला सुरक्षितपणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.
