
कल्याण: नॉनव्हेज खायचं म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. अनेकजण मांसाहारी जेवणातील विविध प्रकार ट्राय करत असतात. चिकनपासून चिकन बिर्याणी, चिकन भाजी, भजी, खिमा, लॉलीपॉप अशा डिश अनेकजण बनवतात देखील. अशीच एक चिकनची प्रसिद्ध डिश म्हणजे चिकन लपेटा होय. हीच चटपटीत आगरी स्टाईल चिकन लपेटा रेसिपी गृहिणी अरुणा नितीन पाटील यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 12, 2025, 15:00 ISTसोमवारी सायंकाळच्या सुमारास दिल्ली येथे अचानक झालेल्या कार ब्लास्टने राजधानी शहर हादरले. हा अपघात इतका गंभीर होता की यात अनेक लोक जखमी झाले, तर काही निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेतील जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात धाव घेतली.आणि जखमींची विचारपूस केली.
Last Updated: November 12, 2025, 16:01 ISTजालना : राज्यात पावसाने माघार घेताच कडाक्याची थंडी जाणवत आहे. हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, ओठ फुटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी जवळपास प्रत्येकजण मार्केटमधील वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीत केलेले महत्त्वाचे बदल देखील आपल्याला त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात. याबाबत माहिती जालना येथील सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी दिली आहे.
Last Updated: November 12, 2025, 14:28 ISTमुंबई : मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. भांडुप पूर्व परिसरात नुकतंच सुरू झालेलं टीपी मॅगी पॉइंट हे ठिकाण सध्या तरुणाईचं नवं आकर्षण बनलं आहे. प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे यांनी उभारलेला हा छोटेखानी पण अत्यंत खास फूड पॉइंट त्यांच्या मेहनतीचा आणि घरगुती चवीच उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणी फक्त चविष्ट मॅगीच नाही तर कोल्ड कॉफी आणि पास्ताही अप्रतिम मिळतो, तेही अगदी परवडणाऱ्या किमतीत. या ठिकाणचा मेन्यू अगदी फक्त 39 पासून सुरू होतो आणि 100 च्या आत संपतो, त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमधील तरुणांपर्यंत सर्वांना हा पर्याय परवडतो.
Last Updated: November 11, 2025, 17:08 ISTवर्धा : आजकाल थायरॉईड ही झपाट्याने वाढणारी गंभीर समस्या आहे. हा आजार गळ्यात असलेल्या थायरॉईडच्या ग्रंथींच्या दुष्परिणामांमुळे होतो. दिवसेंदिवस या आजाराचे भारतामध्ये रुग्ण वाढत असताना दिसून येतात. साधारणतः भारतामध्ये सव्वाचार कोटींपेक्षा जास्त रुग्ण या समस्येने ग्रस्त आहेत. त्यातल्या त्यात महिलांमध्ये थायरॉईडचे प्रमाण सर्वात जास्त बघायला मिळते. गरोदरपणा किंवा प्रसूती नंतरही प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामुळे थायरॉईडचे लक्षणे काय? आणि त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने कोणते उपचार केले जाऊ शकतात यासंदर्भातच वर्धा मधील आयुर्वेद डॉक्टर नितीन मेशकर यांनी माहिती दिली आहे
Last Updated: November 11, 2025, 16:45 IST