Bhaum Pradosh: अठराविश्व दारिद्र्य हटेल! भौमप्रदोष व्रत-उपवास करणाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सुटतात
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
December Bhaum Pradosh: भौम प्रदोष व्रताच्या दिवशी अर्थातच शंभू महादेवाची पूजा केली जाते. सकाळी उपवास करण्याचा संकल्प करून संध्याकाळी प्रदोष काळात विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा केली जाते.
मुंबई : प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व आहे. आज दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी भौम प्रदोष व्रत साजरे केले जाईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरे करण्याची परंपरा आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारी 3:58 वाजेपर्यंत द्वादशी तिथी असेल, त्यानंतर त्रयोदशी तिथी सुरू होईल आणि 3 डिसेंबर रोजी दुपारी 12:26 वाजेपर्यंत असेल. पण, प्रदोष नियमांनुसार प्रदोष व्रत 2 डिसेंबर रोजी साजरे केले जाईल. प्रदोष व्रत मंगळवारी आल्यास त्याला भौम प्रदोष म्हणतात. आर्थिक चणचण, कर्जमुक्ती मिळविण्यासाठी भौम प्रदोष व्रत विधीपूर्वक करणे शुभ मानले जाते. शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घेऊया.
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेचा शुभ काळ -
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी अर्थातच शंभू महादेवाची पूजा केली जाते. सकाळी उपवास करण्याचा संकल्प करून संध्याकाळी प्रदोष काळात विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा केली जाते.
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 5:13 ते 06:04
प्रदोष काळातील पूजेचा शुभ मुहूर्त
गोधुली मुहूर्त - संध्याकाळी 5:57 ते 06:23
advertisement
संध्याकाळी - संध्याकाळी 06:00 ते 07:17
प्रदोष व्रत पूजा पद्धत -
भौम प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, ध्यान करावे आणि नंतर स्वच्छ कपडे घालून पूजास्थळ स्वच्छ करावे आणि तेथे गंगाजल शिंपडावे. यानंतर, तुम्ही धूप आणि दिवे लावून भगवान महादेवाची पूजा करावी आणि उपवास करण्याचा संकल्प घ्यावा. संपूर्ण दिवस उपवास केल्यानंतर, प्रदोष काळाच्या वेळी विधीनुसार भगवान शंकराची पूजा करावी. संध्याकाळच्या पूजेदरम्यान, देवाला बेलपत्र, फळे, फुले इत्यादी अर्पण करावीत. यानंतर, शिव चालीसा पठण करा, शिव मंत्रांचे पठण करा. महादेवाला तिळाचे लाडू किंवा इतर गोड पदार्थ अर्पण करू शकता. शेवटी भगवान शिव आणि देवी पार्वतीची आरती करावी. यानंतर कुटुंबातील सगळ्यांमध्ये प्रसाद वाटून घ्यावा आणि स्वतः प्रसाद खाऊन उपवास सोडावा. प्रदोष विधींनुसार उपवास करून शंकराची पूजा केल्यानं तुम्हाला शुभ फळे मिळतात. तसेच, भौम प्रदोष व्रत उपवास केल्यानं तुम्ही सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त व्हाल.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 7:36 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Bhaum Pradosh: अठराविश्व दारिद्र्य हटेल! भौमप्रदोष व्रत-उपवास करणाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सुटतात


