Vastu Tips: घरात सकाळ-सकाळी हातून या 4 गोष्टी खाली पडणं अशुभ; मोठं संकट येण्याचे ते संकेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: घराबाहेर पडताना काही वस्तू हातातून खाली पडणे हे अशुभ मानले जाते. अपशकुन व्हावा अशा प्रकारे त्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. अशा गोष्टींविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत.
मुंबई : काम करताना एखादी गोष्ट आपल्या हातातून खाली पडण ही तशी सर्वसाधारण बाब आहे. पण काही विशिष्ट वेळ-प्रसंगी घडलेल्या अशा गोष्टी वेगळा विचार करायला भाग पाडतात. सकाळची वेळ कोणत्याही कामासाठी शुभ मानली जाते. पण, सकाळच्या वेळात आपण कुठे बाहेर जाण्यासाठी तयारी करत असतो आणि अचानक काही गोष्टी घडल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सकाळी आपल्या हातातून काही गोष्टी खाली पडणं अशुभ-वाईट मानलं जातं. घराबाहेर पडताना काही वस्तू हातातून खाली पडणे हे अशुभ मानले जाते. अपशकुन व्हावा अशा प्रकारे त्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. अशा गोष्टींविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत.
दूध - वास्तुशास्त्रानुसार, सकाळी लवकर आपल्या हातातून दूध खाली सांडणं ही अशुभ घटना मानली जाते. ज्योतिषशास्त्रात, दूध समृद्धी आणि विपुलतेचे प्रतीक मानले जाते. सकाळच्या वेळी दूध सांडणं म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि प्रगतीवर नकारात्मक परिणाम होतो, असे मानले जाते. तसा प्रसंग घडल्यास त्या दिवशी व्यवहार, आर्थिक बाबी आणि वाहन चालवताना तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे.
advertisement
मीठ - वास्तुशास्त्रानुसार, सकाळी लवकर काही काम करत असताना आपल्या हातातून मीठ खाली पडणं अत्यंत अशुभ मानलं जातं. मीठ हे स्थिरता आणि शांतीशी संबंधित आहे. मीठ हातातून पडून सांडणे म्हणजे वादविवाद, वाढते घरगुती त्रास आणि संयम सुटण्याचे लक्षण मानले जाते. तसं घडल्यास लोकांनी काम करताना संयम राखला पाहिजे.
advertisement
हळद-कुंकू - हळद-कुंकवाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे. अनेक विधींमध्ये त्याचा वापर होतो, शिवाय कुंकवाला सौभाग्याचे प्रतिक मानलं आहे. सकाळी हातातून हळद-कुंकू खाली पडणे देखील खूप अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, कुंकवाला वैवाहिक आनंदाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. कुंकवाचा करंडा हातातून खाली पडला तर ते कुटुंबासाठी किंवा विवाहित जीवनासाठी मोठ्या आपत्तीचे संकेत समजावा. असा प्रसंग घडल्यास आपली दैनंदिन कामे अत्यंत सावधगिरीने करावीत. कोणावरही राग बाळगू नका. इतरांच्या वादात पडू नका. संयमाने वागावे.
advertisement
आरसा - सकाळी हातातून आरसा खाली पडणं हा देखील एक अतिशय अशुभ संकेत मानला जातो. आरसा खाली पडणं म्हणजे घरात वाद, चिंता आणि नातेसंबंधांमध्ये बिघाड अशा गोष्टींचा संकेत. पण, काही धार्मिक श्रद्धांनुसार असेही मानतात की, तुटलेला आरसा तुमच्यावर येऊ शकणारे त्रास आणि अपघात स्वतःवर घेतो. म्हणून ती एक शुभ गोष्ट म्हणून देखील पाहिली जाते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 7:39 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: घरात सकाळ-सकाळी हातून या 4 गोष्टी खाली पडणं अशुभ; मोठं संकट येण्याचे ते संकेत


