Dattatreya Jayanti 2025: भगवान दत्तात्रेय म्हणजे नेमके कोण? दत्त जयंतीचे धार्मिक महत्त्व? शुभ मुहूर्त, पूजा-विधी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Dattatreya Jayanti 2025: यंदाची दत्त जयंती गुरुवार, दिनांक 4 डिसेंबर रोजी आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दत्तात्रेय यांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने
मुंबई : दत्त जयंती महाराष्ट्रात उत्साहात साजरी केली जाते. दत्तगुरू त्रिमूर्तीला आपलं दैवत मानणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दत्तजयंतीनिमित्त राज्यातील खेडोपाडी-शहरांमध्ये दत्तमंदिरात भाविक लोक दर्शनासाठी गर्दी करतात. हिंदू धर्मात दत्तजयंतीचे विशेष महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला असल्याने, दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.
यंदाची दत्त जयंती गुरुवार, दिनांक 4 डिसेंबर रोजी आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिरांमध्ये महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दत्तात्रेय यांचे हिंदू धर्मग्रंथांमध्ये वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे संयुक्त अवतार म्हणून केले आहे. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने त्रिमूर्तीची पूजा करण्याइतकेच फळ मिळू शकते, दत्ताची पूजा केल्यास आपल्यावर या तिन्ही देवतांची कृपा राहते, असे मानले जाते.
advertisement
भगवान दत्तात्रेय कोण आहेत?
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते. दत्तात्रेय जयंतीला दत्तगुरुंची पूजा केल्यानं शुभफळ लगेच मिळते, असे मानले जाते. या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांची प्रार्थना केल्यानं मागील जन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. धार्मिक ग्रंथांमध्ये दत्तात्रेयांचा जन्म ऋषी अत्रि आणि अनसूया यांच्या पोटी झाल्याचे वर्णन केले आहे. दत्तात्रेय त्यांच्या 24 गुरूंसाठी देखील प्रसिद्ध आहेत. दत्तात्रेयांनी 24 गुरूंकडून शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते.
advertisement
मार्गशीर्ष महिना २०२५ पौर्णिमा तिथी
पौर्णिमा तिथी सुरू : 04 डिसेंबर सकाळी 8:37 वाजता
पौर्णिमा तिथी संपते: 05 डिसेंबर सकाळी 04:43 वाजता
दत्तात्रेय जयंती 2025 शुभ मुहूर्त -
advertisement
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 05:14 ते सकाळी 06:06
गोधुली मुहूर्त: संध्याकाळी 05:58 ते संध्याकाळी 06:24
अमृत काळ: दुपारी 12:20 ते दुपारी 01:58
दत्ताची पूजा करण्याची पद्धत -
मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, ब्रह्म मुहूर्तावर उठावे. सकाळी लवकर स्नान करून उपवास आणि पूजा करण्याचा संकल्प करावा.
वर उल्लेख केलेल्या कोणत्याही शुभ मुहूर्ताच्या आधी, पूजास्थळ स्वच्छ करून पूजा मांडावी.
advertisement
शुभ मुहूर्त सुरू झाल्यावर ताटात लाल कापड घालून त्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा.
प्रथम भगवान दत्तात्रेयांना फुले आणि हार अर्पण करा. यानंतर, शुद्ध तुपाचा दिवा लावा. विहीत विधीनुसार आरती करा आणि तुमच्या इच्छेनुसार देवाला नैवेद्य अर्पण करा. शक्य असल्यास, पूजा केल्यानंतर गरजूंना अन्न, धान्य, कपडे इत्यादी दान करा. कमीतकमी 108 वेळा दत्तात्रेय मंत्राचा पाठ करा. रुद्राक्षाच्या माळेने मंत्राचा जप करा.
advertisement
मंत्र: ओम द्रं दत्तात्रेय नमः
ॐ श्री गुरुदेव दत्त
याशिवाय दत्तात्रेय स्तोत्र, अवधूत गीतेतील श्लोक, गुरु स्तुती आणि श्री दत्त चालीसा यांचे पठणही या दिवशी शुभ मानले जाते.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 1:33 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Dattatreya Jayanti 2025: भगवान दत्तात्रेय म्हणजे नेमके कोण? दत्त जयंतीचे धार्मिक महत्त्व? शुभ मुहूर्त, पूजा-विधी


