इडा पीडा टळणार! 2026 मध्ये शनीच्या कृपेने 'या' राशींच्या लोकांचं सुरु होणार 'गुड लक', तुमच्या राशीत काय? वाचा
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
कर्मफळदाता शनिदेव 2026 मध्ये संपूर्ण वर्षभर आपल्या मित्र राशी मीन मध्ये संचार करणार आहेत. शनि हा न्याय, मेहनत आणि शिस्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शनि शुभ स्थितीत असतो, तेव्हा तो व्यक्तीला अपार यश, संपत्ती आणि स्थिरता देतो.
Shani Krupa : कर्मफळदाता शनिदेव 2026 मध्ये संपूर्ण वर्षभर आपल्या मित्र राशी मीन मध्ये संचार करणार आहेत. शनि हा न्याय, मेहनत आणि शिस्तीचा कारक मानला जातो. जेव्हा शनि शुभ स्थितीत असतो, तेव्हा तो व्यक्तीला अपार यश, संपत्ती आणि स्थिरता देतो. 2026 मध्ये शनिदेव अनेक राशींवर 'चांदीच्या पायावर' किंवा अत्यंत शुभ स्थानातून संचार करणार असल्यामुळे, काही राशींचे नशीब चमकेल आणि त्यांना मोठी प्रगती साधता येईल. 2026 मध्ये वृषभ, मिथुन, तूळ, आणि कुंभ या राशींवर शनिदेवाची विशेष कृपा असेल, ज्यामुळे त्यांच्या करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल होतील.
1. वृषभ रास (Taurus): प्रचंड धनलाभ आणि उत्पन्न वाढ
2026 मध्ये शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या 11 व्या भावात संचार करतील. हे स्थान शनीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे या राशींवर शनीची कृपा बरसेल. अशा परिस्थितीत शनीच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होईल.
आर्थिक लाभ: वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात या वर्षात मोठी आणि अनपेक्षित वाढ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तसेच अडकलेले पैसे परत मिळतील.
advertisement
करिअर आणि व्यवसाय: तसेच या वर्षात शनीच्या कृपेमुळे व्यवसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते.
इतर लाभ: वाहन किंवा नवीन घर खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न नवीन वर्षात शनीच्या कृपेमुळे पूर्ण होऊ शकते.
2. मिथुन रास (Gemini): करिअरमध्ये मोठे यश आणि प्रगती
मिथुन राशीसाठी शनिदेव कर्म आणि व्यवसायाच्या 10 व्या भावात संचार करतील. हा राजयोगासारखा शुभ योग निर्माण करतो. यांमुळे मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळेल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल.
advertisement
नोकरी आणि पदोन्नती: कामाच्या ठिकाणी मोठी प्रगती होऊ शकते, तर मिथुन राशीच्या लोकांची इच्छित बदली किंवा उच्च पद प्राप्त होऊ शकते. तुमच्या कामाला वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून चांगला पाठिंबा मिळेल. येणाऱ्या नवीन वर्षात तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक केले जाईल तसेच तुमच्या कामाची दाखल देखील घेतली जाईल.
व्यवसाय: नवीन वर्षात शनी देवाच्या कृपेमुळे व्यवसायात स्थिरता येईल आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार होईल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम ठरेल. तर हा काळ पार्टनरशिपसाठी उत्तम राहील.
advertisement
नातेसंबंध: या वर्षात मिथुन राशीच्या व्यक्तींचे त्यांच्या वडिलांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्हाला त्यांच्याकडून सर्वबाबतीत पूर्ण सहकार्य मिळेल.
3. तूळ रास (Libra): शत्रूंवर विजय आणि नशिबाची साथ
तूळ राशीसाठी शनिदेव शत्रू, कर्ज आणि स्पर्धा या 6 व्या भावात संचार करतील. ही स्थिती तूळ राशीसाठी खूप अनुकूल आहे. याकाळात जर तुमचे कोणाशी वाद सुरु असतील तर त्यात तुम्हाला यश मिळेल, तर तुम्ही कोणतेही कार्य करत असाल तर त्यात तुम्हाला तुमचा नशिबाची साथ देखील मिळेल.
advertisement
शत्रूंवर विजय: तुमचे विरोधक आणि शत्रू कमजोर पडतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय प्राप्त होईल. जर कोणतीही केस सुरु असेल तर त्यात तुम्हाला शनीच्या कृपेमुळे यश प्राप्त होईल.
आरोग्य: दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आरोग्य समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुमच्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. 2026 मध्ये शनीचा तुमच्या राशीवर उत्तम प्रभाव असल्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि अनेक वेळापासून सुरु असलेल्या सामान्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.
advertisement
प्रगती: प्रत्येक आव्हानाला तुम्ही दृढनिश्चयाने तोंड द्याल आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल. करिअरमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
4. कुंभ रास (Aquarius): आर्थिक स्थिरता आणि कर्जमुक्ती
कुंभ राशीचा स्वामी स्वतः शनि आहे आणि तो तुमच्या धन आणि कुटुंबाच्या द्वितीय भावात संचार करेल. येणाऱ्या नवीन वर्षात कुंभ राशी मालामाल होईल. या राशीचा स्वामी ग्रह शनी असल्याने या राशीवर त्यांची विशेष कृपा दिसून येईल. ज्यामुळे तुमच्यावर असलेले कर्ज, आर्थिक अडचणी दूर होतील.
advertisement
आर्थिक सुधारणा: तुमच्या डोक्यावर असलेले कर्ज दूर होईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक जीवन: कुटुंबात आनंद आणि समृद्धी वाढेल. समाजात तुमचा मानसन्मान वाढेल आणि नवीन प्रगतीचे मार्ग उघडतील.
साडेसातीचा शेवट: साडेसातीचा अंतिम टप्पाअसल्याने शनी जाता-जाता तुम्हाला मोठे फायदे देऊन जाईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 4:10 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
इडा पीडा टळणार! 2026 मध्ये शनीच्या कृपेने 'या' राशींच्या लोकांचं सुरु होणार 'गुड लक', तुमच्या राशीत काय? वाचा


