Premanand Maharaj: हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करावी की थंड? प्रेमानंद महाराजांचा सल्ला तर...

Last Updated:

Premanand Maharaj: हिवाळ्याशिवाय इतर ऋतुमध्येही जास्तीत जास्त लोक गरम पाण्यानं अंघोळ करतात. पण असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही, याविषयी आपणास माहीत आहे का? यावर वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी काय मार्गदर्शन केलंय पाहुया.

News18
News18
मुंबई : आजच्या काळात माणूस आपल्या प्रत्येक कामात आराम आणि सुविधा शोधतो. सकाळी उठण्यापासून ते अंघोळ करण्यापर्यंत किंवा काम करण्यापर्यंत, तो प्रत्येक ठिकाणी सोपा मार्ग शोधत असतो. परंतु हीच सवय हळूहळू माणसाला आतून दुबळी बनवते. आपले वडीलधारी नेहमी सांगत आले आहेत की, जो व्यक्ती नेहमी आरामाच्या शोधात असतो, तो कठीण परिस्थितीत टिकाव धरू शकत नाही. पूर्वीचे लोक साधे जीवन जगायचे, साधे अन्न खायचे आणि तरीही त्यांचे शरीर मजबूत आणि मन स्थिर असायचे. पण आज सुख-सुविधांच्या अतिरेकाने माणसाची सहनशक्ती आणि आत्मबल दोन्ही कमकुवत झालं आहे.
हिवाळ्याशिवाय इतर ऋतुमध्येही जास्तीत जास्त लोक गरम पाण्यानं अंघोळ करतात. पण असं करणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे की नाही, याविषयी आपणास माहीत आहे का? यावर वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांनी काय मार्गदर्शन केलंय पाहुया.
गरम पाण्याने स्नान करावे की नाही?
एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना प्रश्न विचारला की, "आम्ही गरम पाण्याने स्नान करावे का?" यावर महाराजांनी उत्तर दिले की, "जर तुम्ही गरम पाण्याने स्नान केले, तर हळूहळू कमकुवत-दुबळे व्हाल."
advertisement
नैसर्गिक ऊर्जा कमी होते: त्यांचे म्हणणे होते की, गरम पाणी शरीराला आराम तर देते, पण ते शरीराची नैसर्गिक ऊर्जा नष्ट करते.
सहनशक्तीचा ऱ्हास: जेव्हा माणूस थंड पाण्याला घाबरू लागतो, तेव्हा त्याचे शरीर आणि मन दोन्ही नाजूक बनतात. हीच नाजुकता हळूहळू व्यक्तीची सहनशक्ती आणि आत्मबल संपवून टाकते.
advertisement
प्रकृतिशी समन्वय आवश्यक: पुढे प्रेमानंद महाराज म्हणतात की, माणसाने प्रकृतीपासून पळून न जाता, तिच्याशी ताळमेळ साधायला शिकले पाहिजे. जेव्हा व्यक्ती थंड पाण्याने स्नान करतो, तेव्हा त्याचे शरीर प्रकृतीच्या थंडीला सहन करायला शिकते.
आरोग्य आणि दृढता: यामुळे रक्तसंचार (Blood Circulation) सुधारतो, मानसिक दृढता येते आणि शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो. हीच नैसर्गिक ऊर्जा जीवनात अनुशासन आणि संयम राखण्यास मदत करते.
advertisement
तपस्येचे महत्त्व - महाराजांच्या मते, थंड पाण्याने स्नान करणे ही केवळ एक शारीरिक क्रिया नाही, तर एक प्रकारची तपस्या आहे. ही तपस्या शरीर आणि मन दोन्ही शुद्ध करते. थंड पाण्याची हुडहुडी आपल्याला सहनशील बनवते आणि आतून भक्कम करते. जेव्हा व्यक्ती आरामाऐवजी तपस्येची निवड करतो, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि तो आपल्या जीवनात मोठी उद्दिष्ट्ये प्राप्त करू शकतो.
advertisement
ब्रह्मचर्याचा खरा अर्थ - प्रेमानंद महाराजांनी हे देखील सांगितलंय की, ब्रह्मचर्य म्हणजे केवळ लैंगिक संयम नव्हे, तर ती आपल्या ऊर्जेला योग्य दिशेने लावण्याची कला आहे. व्यक्ती थंड पाण्याने स्नान करण्यासारख्या छोट्या-छोट्या तपस्या करतो, तेव्हा त्याचे शरीर दृढ आणि मन संयमित बनते. असा व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकतो आणि योग्य कार्यांवर लक्ष केंद्रित करू शकतो.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Premanand Maharaj: हिवाळ्यात गरम पाण्यानं अंघोळ करावी की थंड? प्रेमानंद महाराजांचा सल्ला तर...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement