‘सावधान’ यंदा शुभमंगलचे मुहूर्त कमी, कर्तव्यासाठी करावी लागणार लगबग; लग्नाळूंनो उडवा झटपट लग्नाचा बार
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
पावसाळा आणि दिवाळी संपताच वेध लागतात ते लगीन सराईचे. हा असा काळ असतो जेव्हा आपल्या घरी कुणा ना कुणाची लग्नाची पत्रिका आणि आमंत्रण येतं. अशावेळेस लगबग सुरु होते आणि मुहूर्त काढला जातो.
Mumbai : पावसाळा आणि दिवाळी संपताच वेध लागतात ते लगीन सराईचे. हा असा काळ असतो जेव्हा आपल्या घरी कुणा ना कुणाची लग्नाची पत्रिका आणि आमंत्रण येतं. अशावेळेस लगबग सुरु होते आणि मुहूर्त काढला जातो. तुळशी विवाहानंतर तरुण-तरुणींना बोहल्यावर चढण्याचे वेध लागतात. पण लग्न ही अशी गोष्ट आणि परंपरा आहे जिथे योग्य घराणं, मुहूर्त आणि नातेवाईक यांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते.
यंदा कर्तव्य झटपट आहे?
लग्नाचा विचार केला की आधी आपण वधू-वरची कुंडली पाहिली जाते. यानंतर कुंडली जुळली की लगबग सुरु होते ती लग्नाच्या प्रत्येक विधीची. फक्त लग्नाचाच योग्य मुहूर्त पाहिला नाही जात. अशावेळेस, साखरपुड्याची तारीख, लग्नाचा मुहूर्त या सर्वांवर लक्ष दिले जाते. पण या मागे नेमकं कारण काय तुम्हाला माहिती आहे का? या मागे अनेक गोष्टी लपलेल्या आहेत, जसे की ग्रहांची योग्य दिशा, पत्रिकेतील दोष अजून बरच काही. या वर्षी जर कोणी लग्न करण्याची इच्छा ठरवत असेल तर त्यांना घाई करायची गरज आहे. कारण यावर्षी मुहूर्त फारच कमी आहेत.
advertisement
यावर्षी किती शुभं मुहूर्त?
यंदाच्या वर्षी मोजक्या विवाह मुहूर्तांच्या आधारे सप्तपदी पूर्ण करावी लागेल. मागील वर्षीच्या 69 विवाह मुहूर्तांच्या तुलनेत डिसेंबर ते जुलै 2026 पर्यंत एकूण 50 मुहूर्त असतील. या आठ महिन्यांच्या कालावधीत जानेवारी व ऑगस्ट व पुढे डिसेंबर 2026 पर्यंत मुहूर्त नसतील, अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. सोमण म्हणाले, की यंदाच्या वर्षी विवाह सोहळ्याचे केवळ 50 मुहूर्त आहेत.
advertisement
* नोव्हेंबर 2025 - 23, 25, 26, 27, 30.
* डिसेंबर 2025 - 2, 5.
* जानेवारी - मुहूर्त नाही
* फेब्रुवारी - 3, 5, 6, 7, 8, 10, 20, 25, 26.
* मार्च - 5, 7, 8, 12, 14, 15, 16.
* एप्रिल- 21, 26, 28, 29, 30
advertisement
* मे - 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13, 14
* जून - 19, 20, 23, 24, 27
* जुलै - 1, 2, 3, 4, 8, 9, 11
view commentsविवाहमुहूर्त हा शास्त्रानुसार निवडायचा की रविवार या सुट्टीच्या दिवसांवर नातेवाईक, मित्रमंडळीचा मान राखायचा हे विवाहेच्छुकांसमोर मोठे आव्हान असते. धर्मशास्त्रानुसार गुण व कुंडली पाहून विवाहाची तारीख ठरवली जाते. तर विवाहेच्छुक हे मंगल लग्नघटिका कार्यालयाची उपलब्धता व सुट्टीचा दिवस पाहत मुहूर्तावर अधिक भर देतात. यंदा जुलैपर्यंत एकूण 50 मुहूर्त विवाह सोहळ्यासाठी आहेत. यातील सर्वाधिक मुहूर्त हे फेब्रुवारी व मे या महिन्यांत आहेत. डिसेंबर 2025 या महिन्यांत 2 व 5 याच दोन तारखा आहेत. नववर्षाच्या आरंभाला जानेवारीत एकही विवाह मुहूर्त नाही. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 10 मुहूर्त आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 2:04 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
‘सावधान’ यंदा शुभमंगलचे मुहूर्त कमी, कर्तव्यासाठी करावी लागणार लगबग; लग्नाळूंनो उडवा झटपट लग्नाचा बार


