बीडमध्ये ढाबा मालकाची निर्घृण हत्या, मारेकऱ्यांनी रातोरात पुणे गाठलं, तिघांना अटक
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: बीडच्या माजलगाव येथील ढाबा मालक महादेव गायकवाड यांची काही जणांनी हत्या केली होती.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीडच्या माजलगाव येथील ढाबा मालक महादेव गायकवाड यांची काही जणांनी हत्या केली होती. बिलाच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दारुच्या नशेत असलेल्या तिघांनी लाकडी दांड्याने मारहाण करत ढाबा चालकाचा जीव घेतला होता. ही हत्या केल्यानंतर तीन आरोपी पुण्याला पळून गेले होते. तिघांना आळंदी येथून ताब्यात घेतलं आहे.
प्रमुख आरोपी रोहित शिवाजीराव थावरे, ऋषिकेश रमेशराव थावरे, कृष्णा माणिकराव थावरे सर्वजण राहणार आनंदगाव यांना आज पहाटे आळंदीतून येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली. अटकेची कारवाई पूर्ण झाल्यानंतर आरोपींना न्यायलयात हजर केलं जाणार आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव येथील परभणी रोडवर महादेव गायकवाड यांचे गावरान धाबा नावाचे हॉटेल आहे. रविवारी या हॉटेलवर रोहित शिवाजीराव थावरे आणि त्याचे इतर दोन मित्र पार्टी करायला आले होते. यावेळी आरोपी ऋषिकेश रमेशराव थावरे आणि कृष्णा माणिकराव थावरे यांचा ढाबा मालकाशी बिल देण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर एका आरोपीने बाजूलाच असलेला लाकडी दांडा उचलून महादेव गायकवाड यांच्या डोक्यात घातला. तर महादेव गायकवाड यांचा मुलगा आशुतोष गायकवाडही या मारहाणीत जखमी झाला.
advertisement
दोघांनाही उपचारासाठी माजलगावच्या संजीवनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. यातील महादेव गायकवाड यांचा सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी आशुतोष गायकवाड यांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण ठाण्यात रोहित शिवाजीराव थावरे व अन्य दोन अनोळखी तरुणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. या घटनेत कृष्णा माणिकराव थावरे आणि ऋषिकेश रमेशराव थावरे यांचा सहभाग निश्चित करण्यात आला होता. त्यावरून पोलिसांनी आज मंगळवारी तिघांना पुण्यातील नगर परिषद चौक आळंदी येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
April 22, 2025 1:54 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीडमध्ये ढाबा मालकाची निर्घृण हत्या, मारेकऱ्यांनी रातोरात पुणे गाठलं, तिघांना अटक


