मुलीवर अत्याचार, पीडितेच्या जिवंत वडिलांना वाहिली श्रद्धांजली, पुढे नराधमाने केलं बीडला हादरवणारं कांड!

Last Updated:

Crime in Beed: बीडच्या केज तालुक्यात पुन्हा एकदा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. इथं एका बलात्कार प्रकरणातील नराधमाने तुरुंगातून सुटल्यानंतर पीडितेच्या वडिलांसोबर क्रूर कृत्य केलं आहे.

News18
News18
बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा सातत्याने विविध गुन्ह्यांसाठी चर्चेत येत आहे. एकीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजत असताना बीडमध्ये अत्याचार आणि खूनाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीयेत. दोन दिवसांपूर्वी बीडच्या माजलगावमध्ये एका ढाबा मालकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली. हत्येची ही घटना ताजी असताना आता बीडच्या केज तालुक्यात पुन्हा एकदा जिल्ह्याला हादरवणारी घटना समोर आली आहे. इथं एका बलात्कार प्रकरणातील नराधमाने तुरुंगातून सुटल्यानंतर पीडितेच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून आरोपीनं हे कृत्य केलं आहे. आरोपीनं कोयता, भाला आणि कुऱ्हाडीच्या सहाय्याने पीडितेच्या शिक्षक वडिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडितेचे वडील बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीनं कुऱ्हाड, भाला आणि कोयता घटनास्थळी टाकून पळ काढला. या प्रकरणी शिक्षकाच्या पत्नीने केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सूरज गुंड असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. त्याने काही दिवसांपूर्वी एका जखमी शिक्षकाच्या मुलीवर अत्याचार केला होता. या प्रकरणी सूरजवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात त्याला अटकही झाली होती. पण जामीनावर सुटल्यानंतर सूरजने पीडितेच्या आई वडिलांविरोधात सूड उगवला आहे. घटनेच्या दिवशी मंगळवारी आरोपीनं पीडित मुलीच्या शिक्षक वडिलांच्या कारवर ट्रॅक्टर चढवला.
advertisement
तसेच कोयता, भाला आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना केज तालुक्यातील वरपगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली. हल्ल्यानंतर संशयित सूरज गुंड याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शिक्षकाच्या मुलीचे फोटो व्हायरल केले. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर शिक्षक दाम्पत्याच्या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलं. याबाबत शिक्षकाच्या पत्नीने केज पोलिसांत तक्रार दिली आहे.
advertisement
नराधमाने हल्ला केल्यानंतर जेव्हा शिक्षकाच्या कारचा चालक आणि इतर सहकाऱ्यांनी सूरज गुंडला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. इथून पळून जा, नाहीतर तुम्हालाही सोडणार नाही, अशी धमकी त्याने दिली. या हल्ल्यात शिक्षक बेशुद्ध झाल्यानंतर आरोपीने घटनास्थळी कुऱ्हाड, भाला, कोयते कारजवळ टाकून पळ काढला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
मुलीवर अत्याचार, पीडितेच्या जिवंत वडिलांना वाहिली श्रद्धांजली, पुढे नराधमाने केलं बीडला हादरवणारं कांड!
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement