जळगावातील माजी उपसरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 31 डिसेंबरला घडलेला कांड कारणीभूत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Yuvraj Koli Case: अलीकडेच जळगावातील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
जळगाव: अलीकडेच जळगावातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. गावातील तीन जणांनी युवराज कोळी यांच्यावर चाकू आणि चॉपरने वार करत निर्घृण हत्या केली. राज्यात बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत असताना, जळगावात अशाप्रकारे माजी उपसरपंचाची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली.
युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच होते. २१ मार्चला गावातीलच तिघांनी युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्यावर चाकू आणि चॉपरने सपासप वार केले. या हल्ल्यात युवराज यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींपैकी दोन आरोपींना घेतले ताब्यात आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हत्येचं कारण समोर आलं आहे. ३१ डिसेंबरला झालेला एक कांड या हत्येस कारणीभूत असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत आरोपी आणि मयत उपसरपंच यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर मयत युवराज कोळी यांना आरोपींनी फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. युवराज कोळी यांनी पार्टीत झालेला वाद किरकोळ समजून याकडे दुर्लक्ष केलं. पण धमकीकडे दुर्लक्ष करणं त्यांच्या जीवावर बेतलं आहे. धमकीनंतर जवळपास तीन महिन्यांनी ३१ डिसेंबरच्या पार्टीत झालेल्या वादाचा आरोपींनी बदला घेतला आहे.
advertisement
21 मार्च रोजी सकाळी युवराज कोळी हे आपली पत्नी आणि बहिणीला दुचाकीवरुन शेतात सोडायला गेले होते. सकाळी आठच्या सुमारास ते घरी परत घरी येत असताना दबा धरुण बसलेल्या तिघांनी युवराज कोळी यांच्यावर चाकू आणि चॉपरच्या सहाय्याने हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, युवराज कोळी यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
युवराज कोळी हा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कार्यकर्ता होता. त्यामुळे त्याला चांगले काम मिळत होते. त्याच्यावर असलेल्या या रागातूनच आरोपींनी त्याचा खून केल्याचा आरोप मयत युवराज कोळी यांच्या बहिणीने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. तिसऱ्या मारेकऱ्याला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना केलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
March 23, 2025 8:41 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
जळगावातील माजी उपसरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 31 डिसेंबरला घडलेला कांड कारणीभूत


