Jalgaon News : गाडीमध्ये ‘हिरोपंती’ महागात पडली, पिस्तुलाचा खेळ मित्राच्या जीवावर उठला!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jalgaon Crime News : जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्राने गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: जळगावच्या भुसावळ येथे तृतीयपंथींच्या कार्यक्रमाला हजेरी लावून परत येत असलेल्या तिघा मित्रांपैकी एका मित्राची हिरोपंतीमुळे भीषण घटना घडली. जळगावच्या शिवाजीनगर परिसरातून गाडी जात असताना एका मित्राने गावठी पिस्तुलाशी खेळताना चुकून गोळी झाडली आणि ती थेट नाजिम पटेल या तरुणाच्या पाठीत घुसली. या गोळीबारात नाझीम गंभीर जखमी झाला आहे.
तोहित देशपांडे आणि नाजिम पटेल हे दोघं जण आपल्या एका अन्य मित्रासह भुसावळ येथे तृतीयपंथींच्या कार्यक्रम बघण्यासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री अडीच वाजता, हे तिघे पाळधीकडे परतत होते. याच वेळी त्यांच्या सोबत असलेला तोहित देशपांडे हा गाडी त मागच्या सीटर बसून गावठी पिस्तुलीशी खेळत होता.
काय झालं नेमकं?
पिस्तुलासोबत खेळत असताना बंदुकीचे ट्रिगर मागेपुढे करून हिरोपंती करत असताना अचानक पिस्तुलमधून गोळी सुटली आणि ती नाजिमच्या पाठीत घुसली. घटनेनंतर वाहनात असलेले सगळेच मित्र घाबरून गेले. त्यांनी नाजिमला तात्काळ जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आणि नंतर सकाळी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या प्रकरणानंतर गोळी झाडणारा तोहित देशपांडे स्वतःहून स्थानिक गुन्हे शाखेकडे शरण गेला आहे.
advertisement
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून गावठी पिस्तुलीसह वाहनात फिरणाऱ्या मित्रांचा उद्देश काय होता?, याचा तपास पोलीस करत आहेत.
जखमी नाजिमची प्रकृती कशी?
जखमी नाजिम पटेलची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली आहे. पोलीस या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत असून, गावठी पिस्तूल घेऊन हे तिघे मित्र का फिरत होते?, त्यांच्याकडे हे शस्त्र कुठून आले, याचा तपासही सुरु आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 15, 2025 10:19 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon News : गाडीमध्ये ‘हिरोपंती’ महागात पडली, पिस्तुलाचा खेळ मित्राच्या जीवावर उठला!


