Jalgaon Crime : जळगावात खळबळ! विरोध केल्याने घरात घुसून छेडछाड, अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल

Last Updated:

Jalgaon Crime : घरात घुसूनच टवाळखोरांनी बहिणीचीही छेडछाड केल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये घडली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव: राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. जळगाव जिल्ह्यात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाडीचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणानंतर जळगावमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. आता, या प्रकरणानंतरही जिल्ह्यात मुलींच्या छेडछाडीची घटना सुरू आहे. घरात घुसूनच टवाळखोरांनी बहिणीचीही छेडछाड केल्याने एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगावमध्ये घडली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढत तिला मारहाण केली. टवाळखोरांच्या या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या पीडित मुलीला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात दाखल करण्यात आले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.
advertisement
अल्पवयीन पीडित मुलगी ही शाळेत जात असतानाही टवाळखोर तिच्या मागावर असायचे. मुलगी शाळेत जाताना टवाळखोरांकडून शेतात जाताना पाठलाग केला जायचा. वारंवार अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडित मुलीने केला. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळखोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढली. त्याशिवाय बहिणीलादेखील मारहाण केल्याचा पीडित मुलीसह तिच्या वडिलांनी आरोप केला आहे.
advertisement
या प्रकरणी अद्यापही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर घडलेला सगळा प्रसंग सांगितला. यावेळी त्यांनी या टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon Crime : जळगावात खळबळ! विरोध केल्याने घरात घुसून छेडछाड, अल्पवयीन मुलीने उचललं टोकाचं पाऊल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement