Maharashtra Crime: रेल्वे स्थानकात आढळली कोट्यवधी रुपयांनी भरलेली बॅग, सत्य कळताच पोलीस हादरले!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पोलिसांना चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पोलिसांना चक्क पैशांनी भरलेली बॅग सापडली. पण पोलिसांनी बॅगेतील नोटा तपासल्या असता पोलिसांनाच धक्का बसला. भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जणांच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांना त्यांच्यावर संशय आला होता. यानंतर पोलिसांनी आरोपींची बॅग तपासली असताना त्यांना बॅगेत नोटा आढळल्या. या प्रकरणी पोलिसांनी एकाला जागीच ताब्यात घेतलं. मात्र दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरला.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जण संशयास्पद पद्धतीने फिरत होते. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या बॅगेत जवळपास एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. दोघही जण मलकापूर येथून भुसावळला आले होते. पण रेल्वे स्थानकावर उतरताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
advertisement
पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार झाला. तर दुसऱ्या संशयताला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट खरी तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा होत्या. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयताकडून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
आरोपीनं या नोटा नेमक्या कशासाठी आणल्या होत्या. याचा वापर कशासाठी होणार होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रेल्वेतून अशापद्धतीने नकली नोटांची तस्करी होत असल्याने रेल्वे पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. यापूर्वी आरोपींनी अशाप्रकारे नकली नोटांची तस्करी केली होती का? या नोटा कशासाठी वापरल्या? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
March 28, 2025 7:35 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Maharashtra Crime: रेल्वे स्थानकात आढळली कोट्यवधी रुपयांनी भरलेली बॅग, सत्य कळताच पोलीस हादरले!


