बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! पुतण्यांनी काकूला दिला भयंकर मृत्यू, कारण वाचून चक्रावाल
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Beed: बीडच्या परळी तालुक्यात दोन पुतण्यांनी आपल्या काकूची निर्घृण हत्या केली आहे. हत्येचं कारण वाचून पोलीसही हैराण झाले आहेत.
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरत आहे. अलीकडेच बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना ताजी असताना बीड जिल्ह्यातील विविध भागातून हत्येच्या विविध घटना समोर येत आहे. आता पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं बीड हादरलं आहे.
बीडच्या परळी तालुक्यात दोन पुतण्यांनी आपल्या काकूची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दोन पुतण्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे असं गुन्हा दाखल झालेल्या पुतण्यांची नावं आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांना दारुचं व्यसन आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने काकूंकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पण काकूंनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीनं काकूंसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पुतण्याने काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केला.
advertisement
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून पुतण्याने अशाप्रकारे काकूची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिमळाबाई कावळे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणात शिरसाळा पोलिसांनी पुतण्या चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
May 02, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! पुतण्यांनी काकूला दिला भयंकर मृत्यू, कारण वाचून चक्रावाल


