Jalgaon: 'मला संसार नको, साधू बनायचंय', पत्नीने विरोध करताच शिक्षक झाला सैतान, केलं न शोभणारं कांड
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Jalgaon: जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एक विचित्र असा प्रकार समोर आला आहे.
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे एक विचित्र असा प्रकार समोर आला आहे. वरणगाव परिसरातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने अचानक साधू बनण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. पत्नीने या निर्णयाला विरोध केला असता त्यांच्यात वाद होऊन संतप्त झालेल्या शिक्षकाने तिला मारहाण केली. आरोपी शिक्षक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पत्नीवर चाकूने हल्ला केला. या प्रकरणानंतर पत्नीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
भिमराव गोसावी असं गुन्हा दाखल झालेल्या शिक्षक पतीचं नाव आहे. गोसावी यांचं मागील काही दिवसांपासून संसाराकडे दुर्लक्ष झालं होतं. ते घरापेक्षा अधिक काळ बाहेर घालवत होते. अशातच अचानक त्यांनी घर सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या पत्नी व कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली. पत्नीने पतीला समजावण्याचा प्रयत्न केला.
पण साधू बनण्याच्या निर्णयामुळे दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पतीने पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी घर सोडून निघून गेला. त्यानंतर काही तासांनी आरोपी शिक्षक साधूच्या वेशात वरणगांव पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. मला घरी राहायचं नाही, मी मंदिरात राहणार आहे, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.
advertisement
पत्नीला मारहाण झाल्यावर जखमी अवस्थेत पत्नीने वरणगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे आरोपी शिक्षकाला दोन अपत्यं आहेत. त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र अलीकडे अचानक त्यांच्या वागण्यात बदल झाल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे साधू बनायचा विचार आणि दुसरीकडे पत्नीवर केलेला हल्ला, यामुळे परिसरात विविध चर्चा रंगल्या आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
April 29, 2025 8:52 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon: 'मला संसार नको, साधू बनायचंय', पत्नीने विरोध करताच शिक्षक झाला सैतान, केलं न शोभणारं कांड


