'तू लय माजलीय', बीडमध्ये शेजाऱ्याकडून महिलेला मारहाण, CCTV VIDEO आला समोर

Last Updated:

Crime in Beed: बीड शहरातील धानोरा परिसरात एका महिलेला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बेदम मारहाण केली आहे.

News18
News18
सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड: बीड शहरातील धानोरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं एका महिलेला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने बेदम मारहाण केली आहे. आरोपीनं पीडित महिलेचे केस ओढत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
वसंत खेडकर असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. तर दिक्षा कोरडे असं मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. महिलेला मारहाण होताना तिची लेकरं सुद्धा त्या आरोपी नराधमांला रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. पण आरोपी पीडितेच्या १३ वर्षीय मुलीला देखील चापट मारली आहे.
advertisement
नेमका हा संपूर्ण प्रकार कसा घडला, याबाबत पीडित महिलेने आपबिती सांगितली आहे. मारहाणीवर प्रतिक्रिया देताना पीडित महिलेनं सांगितलं की, मी साडे सात वाजता ड्युटीवरून घरी आले होते. यानंतर ५-१० मिनिटांत मुलगा घरी आला आणि शेजारचे काका ओरडत आहेत, असं सांगितलं. ते का ओरडत आहेत, हे विचारायला मी गेले. यावेळी खेडकर म्हणाला की, पोरांना रस्त्यावर खेळायला सोडतीस का? तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का? मग मी घाला बरं असं म्हटलं. यानंतर खेडकरने अश्लील शिवीगाळ करत मारहाण करायला सुरुवात केली. तू तर लय माजलीय, असं म्हणत अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केली. त्याने मला केसात हात घालून अवघड जागेवर लाथा बुक्क्याने मारलं.
advertisement
या मारहाणीनंतर तो धारदार वस्तू घेऊन आला होता. मात्र भांडणात माझी नणंद मध्ये आली, यामुळे आरोपी मागे फिरला. नाहीतर त्याने आम्हाला सगळ्यांना मारून टाकलं असतं. आरोपीने आणि त्याच्या बायकोने मला त्यांच्या घरात ओढत नेत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, असं पीडित महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
'तू लय माजलीय', बीडमध्ये शेजाऱ्याकडून महिलेला मारहाण, CCTV VIDEO आला समोर
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement