बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा! 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट्ट गोत्यात, पोलिसांनी केली अटक

Last Updated:

Vikram Bhatt Fraud Case: राजस्थान आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना मुंबईतील वर्सोवा येथून अटक केली आहे.

News18
News18
मुंबई: बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. सुमारे ३० कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांखाली राजस्थान आणि मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना मुंबईतील वर्सोवा येथून अटक केली आहे.
उदयपूरमधील 'इंदिरा आयव्हीएफ'चे मालक डॉ. अजय मुर्डिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. डॉ. अजय मुर्डिया यांनी उदयपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत.

डॉ. मुर्डिया यांचे विक्रम भट्ट यांच्यावर गंभीर आरोप

डॉ. मुर्डिया यांनी तक्रारीत म्हटले आहे की, विक्रम भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना चार चित्रपटांमध्ये, ज्यात त्यांच्या दिवंगत पत्नीच्या बायोपिकचाही समावेश होता, ३० कोटींहून अधिक रक्कम गुंतवण्यासाठी राजी केले. या आरोपींनी चित्रपटांमध्ये गुंतवणूक केल्यास तब्बल २०० कोटी रुपयांपर्यंत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. मात्र, मोठी रक्कम घेऊनही भट्ट यांनी चित्रपट पूर्ण केले नाहीत आणि दिलेले वचन पाळले नाही, अशी डॉ. मुर्डिया यांची तक्रार आहे.
advertisement

भट्ट कुटुंबासह ८ जणांवर गुन्हा दाखल

या संपूर्ण फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट यांच्यासह एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरातून विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना अटक करण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये विक्रम आणि श्वेतांबरी यांच्यासह त्यांची मुलगी कृष्णा भट्ट, उदयपूरचा स्थानिक दिनेश कटारिया, सहनिर्माता महबूब अन्सारी आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.
advertisement
यापूर्वी या प्रकरणात सहनिर्माता महबूब अन्सारी याला अटक झाली होती. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणातील करारांची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट आणि झालेल्या व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.
बॉलिवूडमधील एका मोठ्या दिग्दर्शकाला आणि त्यांच्या पत्नीला अशा प्रकारे आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे इंडस्ट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
बायोपिक बनवण्याच्या नावाखाली घातला गंडा! 30 कोटींच्या फसवणुकीप्रकरणी विक्रम भट्ट गोत्यात, पोलिसांनी केली अटक
Next Article
advertisement
Gold Price Prediction 2026: ...तर, २०२६ मध्ये सोनं होणार २० टक्क्यांनी स्वस्त! 'या' एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज
  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

  • ..तर, २०२६ मध्ये सोनं २० टक्क्यांनी स्वस्त! या एका रिपोर्टने दिली गुड न्यूज

View All
advertisement