Govinda Hospitalised : मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govinda Hospitalised : बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदाला नेमकं काय झालं?
अभिनेते धर्मेंद्र मागील 12 दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. धर्मेंद्र त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यानंतर अभिनेते प्रेम चोप्रा यांचीही तब्येत बिघडल्याने त्यांनाही लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बॉलिवूडचे दोन दिग्गज स्टार रुग्णालयात असल्याने सगळेच चिंतेत आहेत. अशातच बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदाने देखील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. PTI च्या वृत्तानुसार, अभिनेता गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोविंदाचे अत्यंत जवळचे मित्र ललित बिंदल यांनी गोविंदाची तब्येत बिघडली असल्याची माहिती दिली आहे. गोविंदाला रात्री घरी असताना चक्कर आली. त्यानंतर त्याला जुहूतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाला सुरुवातीला डॉक्टरांनी घरीच फोनवरून काही सुचना दिल्या. फोनवरून सल्लामसलत करून त्याला प्रथमोपचार देम्यात आले. मात्र काही फरक न पडल्याने आणि प्रकृती आणखी बिघडल्याने रात्री 1 वाजताच्या सुमारास त्याच्या कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.
advertisement
VIDEO | Mumbai: Actor Govinda rushed to Juhu CritiCare Hospital after losing consciousness. Visuals from outside the hospital.#MumbaiNews
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QqDN2u5DTM
— Press Trust of India (@PTI_News) November 12, 2025
advertisement
अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल होण्याच्या एक दिवस आधी अभिनेते धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात गेला होता. त्याला ब्रीच कँडी रुग्णालयात जात असताना स्पॉट करण्यात आलं. त्याचा हॉस्पिटल बाहेरील कारमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mumbai, Maharashtra: Actor Govinda leaves Breach Candy Hospital, where veteran actor Dharmendra is admitted pic.twitter.com/LFCr4dYVv2
— IANS (@ians_india) November 10, 2025
advertisement
गेला काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदाच्या डिवोर्सच्या चर्चा सुरू आहेत. त्याचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचं बोललं जात आहे. मला पुरावे मिळाल्याशिवाय मी काही बोलणार नाही असं सुनिताने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. सुनिता अहुजा अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाची अनेक सीक्रेट बाहेर काढताना दिसतेय. सुनिताने डिवोर्स फाइल केला होता असंही सांगितलं जातं आहे.
advertisement
दरम्यान एक वर्षांआधी देखील गोविंदा रुग्णालयात दाखल झाला होता. पहाटे घरात तयारी करत असताना त्याच्या परवानाधारक रिवॉल्वरमधून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली होती. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. तो काही दिवस रुग्णालयात दाखल होता. त्याच्या प्रकृतीबाबत चाहत्यांना चिंता लागून होती. त्यानंतर बरोबर एक वर्षांनंतर गोविंदा पुन्हा त्याची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल झाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda Hospitalised : मोठी बातमी! अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली, मध्यरात्री रुग्णालयात दाखल


