सलमान खानचा Bigg Boss 19 ला रामराम, 'वीकेंड का वार' कोण करणार होस्ट?

Last Updated:

Salman Khan Leaves Bigg Boss 19 : फिनालेआधीच बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने 'बिग बॉस 19' हा कार्यक्रम सोडला असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हा कार्यक्रम कोण होस्ट करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

News18
News18
Bigg Boss 19 : 'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच हा बहुचर्चित कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. अशातच आता फिनालेआधी सलमानने 'बिग बॉस 19' हा बहुचर्चित कार्यक्रम सोडल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे आता 'वीकेंड का वार' कोण होस्ट करणार याकडे चाहत्यांचं आता लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस 19'च्या चाहत्यांसाठी या आठवड्याचा वीकेंडचा वार थोडा वेगळा असणार आहे. सलमान खान 'वीकेंड का वार'मध्ये प्रत्येक आठवड्यात स्पर्धकांची शाळा घेताना दिसून येतो. पण आता यंदाचा वीकेंड का वार थोडा वेगळा असणार आहे. सलमान खान सध्या इंटरनॅशनल डंबग टूरवर आहे. या चित्रपटाच्या व्यस्ट शूटिंगमुळे सलमानला या आठवड्यात 'बिग बॉस 19'च्या शूटिंगसाठी मुंबईत येता आलेलं नाही. त्यामुळे निर्माते आता नव्या होस्टच्या शोधात आहेत.
रोहित शेट्टी करणार होस्ट
बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक रोहित शेट्टी या आठवड्यात होस्टिंगची धुरा सांभाळणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित शेट्टीदेखील इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय होस्ट आहे. 'खतरों के खिलाडी' या लोकप्रिय कार्यक्रमासाठी तो ओळखला जातो. फराह खान किंवा करण जौहरपैकी कोणीतरी होस्ट करेल, असं आधी म्हटलं जात होतं. करण आणि फराह यांनी याआधीदेखील सलमानच्या अनुपस्थितीत 'बिग बॉस' होस्ट केलेला आहे.
advertisement
रोहित शेट्टीचं 'बिग बॉस'सोबत जुनं नातं
रोहित शेट्टी 'बिग बॉस'चा भाग पहिल्यांदाच होत नाही आहे. 'बिग बॉस 19'च्या तिसऱ्या भागात सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यातील तनाव कमी करण्यासाठी रोहित शेट्टी विशेष एपिसोडमध्ये सहभागी झाला होता. आपल्या खास शैलीत त्याने त्यावेळी दोन्ही स्पर्धकांना शांत केलं होतं. त्यामुळे यंदाही रोहित शेट्टीच्या येण्याने स्पर्धकांमधील वाद कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
'बिग बॉस 19'चा गौरव खन्ना कॅप्टन आहे. त्यामुळे घरातील वातावरण सध्या विचित्र आहे. अमाल मलिक आणि शहबाज सह अनेक स्पर्धक बिग बॉसवर दुजाभाव केल्याबद्दल आरोप करत आहेत. त्यामुळे यंदाचा 'वीकेंड का वॉर' रोहित शेट्टी आपल्या खास शैलीत कसा गाजवणार हे पाहावे लागेल.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
सलमान खानचा Bigg Boss 19 ला रामराम, 'वीकेंड का वार' कोण करणार होस्ट?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement