BIGG BOSS 19: 'तू 1% पण नाहीस...', सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर माज करणाऱ्या शेहबाजला सलमानने सर्वांसमोरच झापलं

Last Updated:

Shehbaz Badesha Bigg Boss 19: शेहबाज याने नुकतेच जे केले, त्याने केवळ प्रेक्षकच नाही, तर खुद्द सलमान खानचाही पारा चढवला. यावरूनच 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने शेहबाजला चांगलेच खडसावले.

News18
News18
मुंबई : 'बिग बॉस १९' आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांनी पूर्ण ताकदीनिशी तयारी करायला सुरुवात केली आहे. पण, शहनाज गिलचा भाऊ शेहबाज याने नुकतेच जे केले, त्याने केवळ प्रेक्षकच नाही, तर खुद्द सलमान खानचाही पारा चढवला. यावरूनच 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने शेहबाजला चांगलेच खडसावले.
झाले असे की, गेल्या आठवड्यात बसीर अली आणि नेहल घराबाहेर पडल्यानंतर शेहबाज म्हणाला होता की, एकदा मला नॉमिनेशनमध्ये येऊ दे. मला नॉमिनेशनमध्ये आल्यावर आपल्याला 'बिग बॉस १३' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याच्या चाहत्यांकडून मदत मिळेल आणि ते आपल्याला वाचवतील, असा दावा शेहबाजने घरात केला. त्याच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आणि 'वीकेंड का वार'मध्ये सलमान खानने याच मुद्द्यावरून शेहबाजला धारेवर धरले.
advertisement

सिद्धार्थच्या नावावर माज करणाऱ्या शेहबाजला सलमानने झापले

सलमान खानने स्पष्ट शब्दांत सांगितले, "तुम्हाला खूप विश्वास आहे की सिद्धार्थ शुक्लाचे चाहते तुम्हाला सपोर्ट करतील. शेहबाज, मी तुम्हाला सांगू इच्छितो की सिद्धार्थने जे काही केले, ते त्याच्या स्वतःच्या बळावर केले आहे. त्याने कोणाचेही नाव उचलले नाही आणि तुमचा खेळ त्याच्या खेळाच्या १ टक्का देखील नाही!"
advertisement
सलमान खानने शेहबाजच्या गेमवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो म्हणाला, "तुम्हाला खरंच वाटते की सिद्धार्थचे चाहते अशा व्यक्तीला सपोर्ट करतील, ज्याचा गेम त्याच्या १ टक्काही नाही? तुम्हाला वाटते की सिद्धार्थ शुक्ला तुमचा खेळ पाहून तुम्हाला सपोर्ट करत असता? देवा त्याच्या आत्म्याला शांती लाभो."
advertisement

शेहबाजच्या वक्तव्यांवरून सलमान भडकला

यावेळी शेहबाजने सलमानला सांगितले की, 'मी तुम्हाला खूप चांगले ओळखतो', यावर सलमानने त्याची चूक दाखवून दिली. सलमान म्हणाला, "मी तुम्हाला माझ्या आयुष्यात फक्त एक किंवा दोनदा भेटलो आहे, तेही शूट्सच्या दरम्यान. तुम्ही मला खूप चांगले ओळखता, हे कधी झाले?"
शेहबाजची विनोदबुद्धी चांगली आहे, हे मान्य करत सलमानने त्याला तो चांगल्या प्रकारे वापरण्याचा सल्ला दिला. सलमान म्हणाला, "तुम्ही विनोदी आहात, तुमचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे, तर तो चांगल्या प्रकारे वापरा आणि बिलो द बेल्ट जाऊ नका. तुमचे अनेक विनोदी क्षण होते, पण आता तुमच्याकडे जोक्सचा बॉक्स संपला आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितले होते की, त्रास देऊ नका आणि बिलो द बेल्ट जाऊ नका."
advertisement
शेहबाजने सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांच्या आधारावर दावा केला होता, की "सिद्धार्थ शुक्लाचे फॅन्स माझ्यासोबत बसले आहेत," या वक्तव्यानंतर सिद्धार्थचे फॅन्स सोशल मीडियावर प्रचंड भडकले होते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
BIGG BOSS 19: 'तू 1% पण नाहीस...', सिद्धार्थ शुक्लाच्या नावावर माज करणाऱ्या शेहबाजला सलमानने सर्वांसमोरच झापलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement