'2-3 रुमाल घेऊन जा, खूप रडायला येतं', कोणतं मराठी नाटक अभिनेत्री रत्ना पाठक शाहला रडवून गेलं!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ratna Pathak Shah Watched Marathi Natak : अनुपम खेर यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह या देखील मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या. मराठी नाटक पाहिल्यानंतर त्यादेखील भारावल्या.
मराठी रंगभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून अनेक चांगल्या विषयाची आणि आशयाची नाटकं आली आहेत. मराठी सिनेमापेक्षा प्रेक्षक मराठी नाटकांना सर्वाधिक प्रतिसाद देताना दिसत आहेत. अनेक मराठी कलाकार सध्या मराठी नाटकांत जाणीवपूर्वक काम करताना दिसत आहेत. मराठी रंगभूमीचं स्थान पहिल्यापासून अढळ स्थानावर होतं आणि ते स्थान आजवर कायम टिकवून ठेवलं आहे. केवळ मराठी प्रेक्षक नाही तर अमराठी प्रेक्षकांनी देखील मराठी नाटक डोक्यावर घेतलं आहे.
काही महिन्यांआधी प्राजक्त देशमुख लिखित दिग्दर्शित 'संगीत देवबाभळी' हे नाटक पाहून बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर भारावून गेले. त्यांनी हे नाटक पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत नाटकाचं, नाटकातील कलाकारांचं, मराठी नाट्यसृष्टीचं कौतुक केलं. अनुपम खेर यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह या देखील मराठी नाटक पाहण्यासाठी गेल्या होत्या. मराठी नाटक पाहिल्यानंतर त्यादेखील भारावल्या. प्रतिक्रिया देत त्यांनी नाटकाचं कौतुक करत, 'जाताना दोन-तीन रुमाल घेऊन जा, खूप रडायला येतं' असंही सांगितलं. अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी कोणतं मराठी नाटक पाहिलं जे त्यांना रडवून गेलं.
advertisement
बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांचं मराठी सिनेमा आणि नाट्यसृष्टीवरच प्रेम कधीच लपून राहिलं नाही. त्या उत्तम मराठी बोलतात, अनेक मराठी नाटकांना त्या आवर्जून हजेरी लावतात. मराठी सिनेमा पाहणं त्यांना आवडलं. त्यांनी नुकतीच एका मराठी नाटकाला हजेरी लावली होती. हे नाटक त्यांना प्रचंड आवडलं. नाटक पाहिल्यानंतर त्यांनी नाटकातील सगळ्या कलाकारांचं कौतुक केलं.
advertisement
रत्ना पाठक शाह या 'असेन मी नसेल मी' हे मराठी नाटक पाहायला गेल्या होत्या. नाटक पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देत त्या म्हणाल्या, ठदोन - चार दिवसांआधी मी एक सुंदर मराठी नाटक पाहिलं, संदेश कुलकर्णी लिखित, अमृता सुभाष दिग्दर्शिक असेन मी नसेन मी. मला खूप आवडलं. अप्रतिम परफॉर्मन्सेस, सुंदर लेखन आणि एक विषयवस्तू जी आपल्या सगळ्यांना आपल्या कुटुंबात दिसतेय."
advertisement
advertisement
"हे नाटक मनाला स्पर्शून गेलं. कारण डिमेन्शिया, अल्झायमर, एजिंग हे सगळं आपल्या कुटुंबाचा हिस्सा झाला आहे. आपण याकडे कानाडोळा करतो, कधीकधी दुसऱ्यांना सांगणं टाळतो. पण हे सत्य आपल्या आयुष्याचं सत्य आहे. माझ्यासाठी तर कदाचित माझ्या भविष्याचं सत्य आहे. पण कंडिशनला, या परिस्थितीला समजून घेणं गरजेचं आहे आणि हे नाटक हे काम करतंय."
advertisement
रत्ना पाठक शेवटी म्हणाला, "सुंदर परफॉर्मन्सेस नीना, राणी सुंदर... सुंदर... आणि अर्थात राणी ( शुभांगी गोखले ) नक्की बघा. विचार करायला भाग पाडेल. जाताना 2-4 रुमाल सोबत घेऊन जा, खूप रडायला येतं".
असेन मी नसेन मी या नाटकांना अभिनेत्री नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकाने आतापर्यंत 22 पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र शासनाचे 8 पारितोषिके, अखिल भारतीय नाट्य परिषद 4 पारितोषिके, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सारख्या पुरस्कारांचा यात समावेश आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'2-3 रुमाल घेऊन जा, खूप रडायला येतं', कोणतं मराठी नाटक अभिनेत्री रत्ना पाठक शाहला रडवून गेलं!


