Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर डिस्चार्ज, आता प्रकृती कशी? समोर आली अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची प्रकृती आता कशी आहे याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान 12 दिवसांनी धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांच्यावर पुढील उपचार हे त्यांच्या घरी केले जाणार असल्याची माहिती ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी दिली आहे. अभिनेते धर्मेंद्र यांना 30 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात आणल्याचं सुरूवातीला सांगण्यात आलं होतं. पण काही दिवसांत त्यांची प्रकृती आणखी बिघडली. तब्बल 12 दिवसांच्या उपचारानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाने PTI शी बोलताना सांगितलं की, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी सकाळी ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. 89 वर्षीय धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारांसाठी घरी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
STORY | Dharmendra discharged, family decides to take him home: doctor
Veteran Bollywood star Dharmendra was discharged from Breach Candy hospital on Wednesday morning after the family decided to take him home for treatment, his treating doctor told PTI.
The 89-year-old has… pic.twitter.com/HSR3SXcn7e
— Press Trust of India (@PTI_News) November 12, 2025
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी म्हणजेच 12 नोव्हेंबरला सकाळी जवळपास 6:30 वाजताच्या सुमारास त्यांना ब्रीच कँड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ब्रीच कँडी रुग्णालया बाहरेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. धर्मेंद्र यांनी स्पेशल अँम्बुलन्सने घरी नेण्यात आलं आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातून धर्मेंद्र यांना घेऊन जाणारी अँम्बुलन्स बाहेर पडताना दिसत आहे. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचं वृत्त समोर येताच चाहत्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. धर्मेंद्र रुग्णालयात दाखल झाल्यापासून त्यांच्या प्रकृतीबाबत सगळेच चिंता व्यक्त करत होते.
advertisement
advertisement
दरम्यान धर्मेंद्र यांच्या मृत्यूची खोटी माहिती पसरवण्यात आली होती. सोशल मीडियावर धर्मेंद्र यांच्या मृत्यूची माहिती वाऱ्याच्या वेगाने पसरल्यानंतर त्यांची मुलगी ईशा देओल आणि पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित नाराजी व्यक्त केली. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत आहे, डॉक्टरांच्या उपचारांना ते प्रतिसाद देत असल्याचं सांगितलं. खोट्या अफवा पसरवू नका असं आवाहनही त्यांनी केलं.
advertisement
ईशाने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, "मीडिया अफवांचा वेगाने प्रसार करत आहे. माझे वडील ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. आमच्या कुटुंबाला कृपया थोडी प्रायव्हसी द्या ही नम्र विनंती. पप्पा लवकर बरे व्हावे यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra Health Update : अभिनेते धर्मेंद्र यांना 12 दिवसानंतर डिस्चार्ज, आता प्रकृती कशी? समोर आली अपडेट


