Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टर काय म्हणाले? ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून मोठी अपडेट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Dharmendra Health Update : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ब्रीच कँडीचे डॉक्टर काय म्हणाले याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेली 12 दिवस त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांआधी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. धर्मेंद्र लवकर बरे व्हावे यासाठी सर्व स्थरातून प्रार्थना करण्यात येत होती. अखेर ती प्रार्थना फळाली आली आणि धर्मेंद्र यांना आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर ब्रीच कँडीचे डॉक्टर काय म्हणाले याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉ. प्रतीत समदानी यांनी धर्मेंद्र यांच्या हेल्थ अपडेट विषयी महत्त्वाची माहिती दिली. त्यांची प्रकृती आता कशी आहे, डिस्चार्जनंतर पुढे काय करणार याबद्दल देखील ते बोलले. डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं की, "धर्मेंद्रजींना आज सकाळी 7:30 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची रिकव्हरी आणि उपचार आता घरीच सुरू राहणार आहे."
advertisement
आज सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या बाहेर धर्मेंद्र यांना घरी घेऊन जाणारी अँम्बुलन्स बाहेर जाताना दिसली. धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओल स्वतः धर्मेंद्र यांच्याबरोबर अँम्बुलन्समध्ये होता. अभिनेते धर्मेंद्र यांना आता जुहू येथील त्यांच्या घरी नेण्यात आलं आहे. तिथेच त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरूच राहतील.
रुग्णालयातील सूत्रांनुसार, त्यांना आता घरी आराम करण्याचा आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कठीण काळात हेमा मालिनी, ईशा देओल, सनी देओल आणि बॉबी देओल सतत रुग्णालयात होते.
advertisement
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, सनी देओल यांच्या टीमने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. निवेदनात म्हटले आहे की, "धर्मेंद्र यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि ते घरीच त्यांचे उपचार सुरू ठेवतील. आम्ही मीडिया आणि जनतेला विनंती करतो की त्यांनी कोणत्याही अपटेड टाळाव्या आणि कुटुंबाच्या प्रायव्हसीचा आदर करावा."
advertisement
टीमने पुढे लिहिले आहे की, "आम्ही सर्वांच्या प्रेम, प्रार्थना आणि शुभेच्छांसाठी आभारी आहोत. कृपया धर्मेंद्रजींच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत राहा. कृपया त्यांचा आदर करा, कारण ते तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करत होते."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 12, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dharmendra Health Update : धर्मेंद्र यांना डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टर काय म्हणाले? ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून मोठी अपडेट


