तेरे जैसा यार कहाँ! 11 दिवसांनी घरी परतले धर्मेंद्र, लाडक्या मित्राला भेटण्यासाठी धावले अमिताभ बच्चन, VIDEO

Last Updated:

Dharmendra Discharge : धर्मेंद्र यांना ११ दिवसांच्या उपचारानंतर आज बुधवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडचे 'ही-मॅन' अशी ओळख असणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर झाली आहे. अखेर ११ दिवसांच्या उपचारानंतर आज बुधवारी सकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. १ नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ८९ वर्षीय धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या कठोर देखरेखीनंतर आता ते घरी परतले आहेत.

घरीच बनवला 'मिनी ICU'

धर्मेंद्र यांना आज सकाळी अॅम्ब्युलन्सद्वारे कडक सुरक्षा व्यवस्थेत घरी नेण्यात आले. आता त्यांना घरी पूर्ण आराम करण्याची आणि नियमित आरोग्य तपासणी करण्याची सक्तीची सूचना डॉक्टरांनी दिली आहे. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबातील सदस्य पत्नी हेमा मालिनी, मुले सनी देओल, बॉबी देओल, आणि ईशा देओल यांनी रुग्णालयात सतत उपस्थित राहून त्यांना आधार दिला.
advertisement
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घरी डॉक्टरांचे एक पथक पोहोचले आहे. त्यांच्या आरोग्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांनी घरीच मिनी ICU तयार केला असून, त्यांची सतत तपासणी केली जात आहे.

अमिताभ बच्चन धावले भेटीला

advertisement
धर्मेंद्र घरी परतल्याची बातमी मिळताच, त्यांचे जुने मित्र आणि सहकलाकार अमिताभ बच्चन यांनी लगेच त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी धाव घेतली. 'शोले'सह अनेक चित्रपटांत एकत्र काम केलेल्या या दोन दिग्गजांमध्ये खूप घट्ट मैत्री आहे. अमिताभ बच्चन यांनी ही मैत्री निभावत धर्मेंद्र यांची भेट घेतली.
advertisement
दरम्यान, धर्मेंद्र यांना भेटण्यासाठी अमिताभ स्वतः कार चालवत त्यांच्या घरी दाखल झाले. यावेळी अमिताभ त्यांची बीएमडब्ल्यू कार चालवताना दिसले. ८३ वर्षीय अमिताभ बच्चन ज्या सहजतेने आणि फुर्तीने गाडी चालवत धर्मेंद्र यांच्या घरी पोहोचले, ते पाहून सर्वच चकित झाले आहेत. अशातच, धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांना भेटण्यासाठी सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, गोविंदा आणि अमीषा पटेल यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी रुग्णालयात हजेरी लावली होती.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
तेरे जैसा यार कहाँ! 11 दिवसांनी घरी परतले धर्मेंद्र, लाडक्या मित्राला भेटण्यासाठी धावले अमिताभ बच्चन, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement