फटाक्यांची आतिषबाजी अन् नंदीवर बसून दणक्यात एन्ट्री, प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन, VIDEO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Prajakta Gaikwad Reception Entry: लग्नातील राजेशाही थाटानंतर आता प्राजक्ता गायकवाडच्या रिसेप्शनची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे, कारण या जोडप्याने केलेली एन्ट्री अत्यंत अविस्मरणीय होती.
पुणे: मराठी मनोरंजनविश्वातील यंदाच्या लगीनघाईत अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचा विवाहसोहळा जोरदार गाजत आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेल्या प्राजक्ताने व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी लग्नगाठ बांधली. लग्नातील राजेशाही थाटानंतर आता त्यांच्या रिसेप्शनची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगली आहे, कारण या जोडप्याने केलेली एन्ट्री अत्यंत अविस्मरणीय होती.
रिसेप्शनसाठी थेट नंदीवर स्पेशल एन्ट्री!
प्राजक्ता आणि शंभुराज यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील ग्रँड एन्ट्रीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांची ही खास एन्ट्री पाहून उपस्थितांसह चाहतेही थक्क झाले आहेत. या जोडप्याने चक्क एका अवाढव्य नंदीवर बसून रिसेप्शनच्या ठिकाणी स्पेशल एन्ट्री घेतली. मराठमोळ्या परंपरेचा हा राजेशाही थाट लक्ष वेधून घेणारा होता. नंदीवरून एन्ट्री होत असताना, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, ज्यामुळे रिसेप्शनच्या ठिकाणी एक अद्भुत आणि स्वप्नवत वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
advertisement
रिसेप्शन लूकमध्ये 'लाल परी'
लग्नात नऊवारी साडीतील पारंपरिक लूकनंतर प्राजक्ता रिसेप्शनमध्येही पारंपरिक, पण आधुनिक वेशात सुंदर दिसत होती. रिसेप्शनसाठी प्राजक्ताने लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती. या साडीवर सोनेरी जरीचे नाजूक पण देखणे नक्षीकाम करण्यात आले होते. तर शंभुराज खुटवड यांनी लाल रंगाच्या साडीला पूरक ठरेल अशा मोती रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या या आकर्षक लूकने या सोहळ्याला चार चाँद लावले.
advertisement
advertisement
शंभुराजांची साथ मिळाली
प्राजक्ताला खऱ्या आयुष्यातही पती म्हणून शंभुराज मिळाल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. पुण्यात पार पडलेल्या त्यांच्या विवाहसोहळ्यातील फोटोही खूप व्हायरल झाले होते. प्राजक्ताने हिरव्या रंगाची नऊवारी साडी, भरजरी सोन्याचे दागिने आणि नथ असा पारंपरिक वेश केला होता, तर शंभुराज यांनी पांढऱ्या रंगाचा अंगरखा आणि फेटा बांधला होता. या जोडप्याच्या लग्नातील प्रत्येक समारंभाचा ग्रँडनेस पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 8:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
फटाक्यांची आतिषबाजी अन् नंदीवर बसून दणक्यात एन्ट्री, प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन, VIDEO VIRAL


