Gauri Garje: अनंत गर्जेची आता 'पॉलीग्राफ टेस्ट', 'द फॅमिली मॅन' सीरिजमध्ये दाखवला होता सीन; असा मिळतो Result!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Gauri Garje Case: पोलिसांनी कोर्टाकडे अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली आहे. लोकप्रिय वेबसीरिज 'द फॅमिली मॅन'मध्येही या टेस्टचा वापर दाखवण्यात आला आहे. ही टेस्ट नक्की कशी होते, जाणून घ्या.
मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी, डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळी येथील घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप केल्याने या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. गौरीच्या कुटुंबाने आरोप केला आहे की, अनंतचे इतर महिलेसोबतचे संबंध उघड झाल्यामुळे अनंत आणि त्याचे कुटुंबीय गौरीला सातत्याने त्रास देत होते. या प्रकरणाच्या कोर्टातील सुनावणीत आज एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ज्यामुळे तपासाची दिशा बदलणार आहे.
अनंत गर्जेला १४ दिवसांची कोठडी
डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यभर खळबळ उडवून दिली असताना, या प्रकरणी आज कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने आरोपी अनंत गर्जेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कोर्टात माहिती दिली की, तपासादरम्यान त्यांनी अनंत गर्जेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला आहे, ज्यामुळे या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे.
advertisement
'पॉलीग्राफ टेस्ट'ची मागणी
पोलिसांनी कोर्टात सांगितले की, या प्रकरणाचा तपास अधिक खोलवर करण्यासाठी अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणे आवश्यक आहे. पोलिसांनी कोर्टाकडे अनंत गर्जेची पॉलीग्राफ टेस्ट करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी ही वैज्ञानिक तपासणी करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली असून, पुन्हा पोलिस कोठडी देण्याचे अधिकार अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली होती.
advertisement
पॉलीग्राफ टेस्ट म्हणजे काय?
पॉलीग्राफ टेस्टला सामान्यतः 'लाय डिटेक्टर' टेस्ट म्हणून ओळखले जाते. ही एक अशी प्रक्रिया आहे, जी व्यक्तीच्या शरीरातील शारीरिक बदलांचे मोजमाप करते. यामध्ये हृदय गती, रक्तदाब, श्वासोच्छ्वास आणि त्वचेची वहनक्षमता तपासली जाते.
एखादी व्यक्ती खोटे बोलत असताना तिच्या शरीरात वेगळे शारीरिक प्रतिसाद येतात, या विश्वासावर ही टेस्ट आधारित आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या या चाचण्या पूर्णपणे विश्वसनीय मानल्या जात नाहीत, कारण केवळ घाबरल्यामुळे किंवा तणावामुळे देखील खोटे बोलतानासारखे शारीरिक प्रतिसाद येऊ शकतात. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने या टेस्टचा वापर तपासाला मदत करण्यासाठी केला जातो. पोलिसांच्या पॉलीग्राफ टेस्टच्या मागणीमुळे आता या प्रकरणाचा तपास वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून होणार आहे.
advertisement
'द फॅमिली मॅन' सिरीजमध्ये पॉलीग्राफ टेस्टचा वापर
'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमध्ये पॉलीग्राफ टेस्टचा वापर दाखवण्यात आला आहे. एका एपिसोडमध्ये श्रीकांतच्या कुटुंबात एकमेकांचे सीक्रेट्स उघड करण्यासाठी 'लाय डिटेक्टर टेस्ट' करण्यात आली होती. सिरीजमध्ये डिटेक्टिव्ह आणि कौटुंबिक जीवन यांचा विनोदबुद्धीने मेळ कसा घातला आहे, याचे हे एक उदाहरण आहे. सिरीजने या पॉलीग्राफ संकल्पनेचा उपयोग गंभीर चौकशीऐवजी विनोदी कौटुंबिक क्षणासाठी केला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gauri Garje: अनंत गर्जेची आता 'पॉलीग्राफ टेस्ट', 'द फॅमिली मॅन' सीरिजमध्ये दाखवला होता सीन; असा मिळतो Result!


