Govinda Health Update : मध्यरात्री अ‍ॅडमिट, दुपारी डिस्चार्ज, गोविंदाला झालेलं काय? स्वत:च दिली हेल्थ अपडेट

Last Updated:

Govinda Health Update : अभिनेता गोविंदा यांना काल रात्री 12 वाजता प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांना त्यांना डिस्चार्ज मिळाला असून त्यांनी चाहत्यांसोबत आपली हेल्थ अपडेट शेअर केली आहे.

News18
News18
Govinda : अभिनेता गोविंदा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मध्यरात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घरी चक्कर आल्याने त्यांच्या कुटुंबियांना त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले होते. पण आता दुपारी गोविंदा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदा यांनी स्वत:च मीडियासोबत हेल्थ अपडेट शेअर केली आहे. धर्मेंद्र यांच्या पाठोपाठ गोविंदा यांना रुग्णालयात दाखल केल्याने चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. पण आता दोघांनाही रुग्णलायातून डिस्चार्ज मिळाला असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे. मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात गोविंदा यांच्यावर उपचार सुरू होते. आता 24 तासांच्या आत त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
काय म्हणाले गोविंदा?
मीडियासोबत हेल्थ अपडेट शेअर करत गोविंदा म्हणाले,"मी खूप जास्त हार्ड वर्क केलं होतं. अति व्यायामुळे मला थकवा आला होता. योग आणि प्राणायाम चांगले आहेत. पण अतीप्रमाणात व्यायाम करणं चुकीचं आहे. व्यक्तिमत्तव अधिक चांगलं कसं होईल यासाठी मी प्रयत्न करत असतो. मला आता वाटतंय उत्तम पर्सनॅलिटीसाठी योग आणि प्राणायम सर्वोत्तकृष्ट आहेत. डॉक्टरांनी मला आता औषध दिली आहेत". यावेळी गोविंदा यांचा काळा टी-शर्ट, चॉकलेटी रंगाचं जॅकेट, जीन्स आणि काळा चश्मा असा लूक होता.
advertisement
advertisement
गोविंदाचे खास मित्र आणि कायदेशीर सल्लागार ललित बिंदल अभिनेत्याला रुग्णालयातून घेण्यासाठी गेले होते. सुनीता आहूजा एका लग्नासाठी गेल्याने ती येऊ शकली नाही, अशा माहिती यावेळी ललित बिंदल यांनी दिली. गोविंदा यांना मंगळवारी सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी त्यांची प्रकृती बिघडली. चक्कर, अशक्तपणा आल्यासारखं वाटत असल्याने गोविंदा यांनी मध्यरात्रीच ललितला बोलावून घेतलं होतं. आता गोविंदा यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
advertisement
धर्मेंद्र यांनाही आज डिस्चार्ज मिळाला असून गोविंदा यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. धर्मेंद्र यांना डिस्चार्ज मिळाल्याचा आनंद गोविंदा यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. धर्मेंद्र यांच्याबाबत बोलताना गोविंदा म्हणाले,"मी त्यांना प्रणाम करतो". धर्मेंद्र आणि गोविंदा दोघेही सुपरस्टार रुग्णालयातून सुखरुप बाहेर पडल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda Health Update : मध्यरात्री अ‍ॅडमिट, दुपारी डिस्चार्ज, गोविंदाला झालेलं काय? स्वत:च दिली हेल्थ अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement