Govinda-Sunita Divorce : 'गोविंदाचे 10 अफेअर्स...', सुनिता अहुजाने फाइल केला डिवोर्स; फेमस प्रोड्यूसरचं स्टेटमेन्ट व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Govinda- Sunita Ahuja Divorce : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवा वाढल्या असून वांद्रे फॅमिली कोर्टात अर्ज दाखल झाला आहे. अशातच एका फेमस प्रोड्यूसरनं दोघांच्या नात्याबद्दल केलेलं स्टेटमेन्ट व्हायरल होतंय.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त आहे. दरम्यान चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यावर केलेलं एक जुनं स्टेटमेन्ट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्यापासून निहलानी यांची जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी गोविंदासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु नंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला. परिस्थिती काहीही असो त्यांचं नातं अतूट आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
advertisement
गोविंदा-सुनीताचे नाते अतूट आहे
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत पहलाज निहलानी यांनी दावा केला होता की, त्यांचं नातं कधीही तुटू शकत नाही. गोविंदाच्या कथित अफेअर्सबद्दलच्या दीर्घकाळ चालणाऱ्या अफवांबद्दल बोलताना ते म्हणाले, "ऐका, सुनीता आणि गोविंदाच्या प्रेमात कोणीही येऊ शकत नाही. सुनीता उघडपणे बोलते पण गोविंदा कधीही दूर जात नाही. त्याचे 10 अफेअर असले तरी त्यांचं लग्न टिकेल."
advertisement
ते पुढे म्हणाला की, "गोविंदा आणि सुनीता यांच्या लाइफस्टाइलमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना खतपाणी मिळत. ते नेहमीच वेगळे राहत आले आहेत. तो नेहमीच दुसऱ्या बंगल्यात मिटिंग घेत असतो. त्याला उशिरापर्यंत झोपण्याची सवय आहे अन्यथा सुनीता नेहमीच त्याच्यासोबत असते. सध्या त्याच्याकडे एकही चित्रपट नाही पण तो दररोज शो करतो आणि सुनीता त्याचे सर्व व्यावसायिक व्यवहार हाताळते."
advertisement

अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते गोविंदा-सुनिता
विशेष म्हणजे सुनीताने स्वतः एकदा कबूल केलं की ती आणि गोविंदा वेगवेगळ्या घरात राहतात. हिंदी रशशी बोलताना ती म्हणाली होती की, "आमची दोन घरे आहेत. आमच्या अपार्टमेंटसमोर एक बंगला आहे. फ्लॅटमध्ये माझे मंदिर आहे. माझी मुले तिथे राहतात. आम्ही फ्लॅटमध्येच राहतो तर तो त्याच्या मिटिंगनंतर उशिरा येतो. त्याला खूप बोलायला आवडतं म्हणून तो 10 लोकांना बसवतो आणि बराच वेळ बोलत राहतो. मी माझा मुलगा आणि माझी मुलगी एकत्र राहतो."
advertisement
यापूर्वीही गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण नंतर असा दावा करण्यात आला की दोघांमध्ये समेट झाला आहे आणि ते पुन्हा एकत्र आहेत. गोविंदाचे व्यवस्थापक शशी सिन्हा यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती. एचटी सिटीशी बोलताना ते म्हणाले होते की, "अलीकडील मुलाखतींमध्ये सुनीताजींनी जे काही सांगितले आहे, ते त्या सर्व गोष्टींचे परिणाम आहे. त्या थोडं जास्त बोलल्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे गोविंदा साहेब, दोघांमध्ये काही मतभेद आहेत."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 11:10 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Govinda-Sunita Divorce : 'गोविंदाचे 10 अफेअर्स...', सुनिता अहुजाने फाइल केला डिवोर्स; फेमस प्रोड्यूसरचं स्टेटमेन्ट व्हायरल


