Maithali Thakur : आमदार झाल्यानंतर मैथिलीचा इमोशनल VIDEO, आई हुंदक्यांनी दाटली, लेकीने सावरलं
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Maithili Thakur on Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर बहुमताने विजयी झाली आहे. आता विजय प्राप्त केल्यानंतर भावूक झालेली मैथिली ठाकूर पाहायला मिळाली.
Maithili Thakur : वयाच्या 25 वर्षी आमदार झालेल्या बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील मैथिली ठाकूर हिचा आवाज सध्या देशभरातच नव्हे तर जगभर गुंजतोय. बिहार विधानसभा निवडणुकीत मैथिली ठाकूर बहुमताने विजयी झाली आहे. मैथिलीने आपल्या गोड आवाजाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण आता बिहार विधानसभेच्या रणांगणात उतरुन तिने मोठं यश संपादन केलं आहे. मैथिली बिहारमधील दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून रिंगणात उतरली होती. तिने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मैथिलीने 11 हजारांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. विजय प्राप्त केल्यानंतर भावूक झालेली मैथिली ठाकूर पाहायला मिळाली. मैथिलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मैथिली ठाकूरचा व्हिडीओ व्हायरल (Maithili Thakur Video)
विजयानंतरचा मैथिली ठाकूरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लेकीच्या विजयामुळे भावूक झालेली आईदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी मैथिली आनंदाने आपल्या आईचे आनंदाश्रू पुसताना दिसत आहे. तसेच तिचे कुटुंबिय विजय... विजय म्हणत आपला आनंद साजरा करत आहेत. या मोठ्या विजयामुळे एकंदरीतच मैथिलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
— Maithili Thakur (@maithilithakur) November 14, 2025
कोण आहे मैथिली ठाकूर?
प्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूरचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील बेनीपट्टी या गावी झाला आहे. तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक असल्याने त्यांनी तिला लहानपणापासूनच लोक संगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं. मैथिलीच्या घरातील वातावरण संगीतमय असल्याने तिला लहानपणापासूनच संगीताची गोडी लागली. गायिकेचे ऋषव आणि अयाची हे दोन भाऊ तबला आणि हार्मोनियम वाजवतात. सुरुवातील मैथिली आपल्या भावांसोबत व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करत असे. तिचे हे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरले आणि तिला एक वेगळी ओळख मिळाली.
advertisement
मैथिली पुढे 'रायझिंग स्टार' या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला. त्यानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपलं गाणं सादर करण्याची संधी मिळाली. आता मैथिली राजकारण आणि गायन दोन्हीची सांगड कशी घालणार याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. देशभरातून मैथिलीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 14, 2025 10:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Maithali Thakur : आमदार झाल्यानंतर मैथिलीचा इमोशनल VIDEO, आई हुंदक्यांनी दाटली, लेकीने सावरलं


