लाईव्ह कॉन्सर्टमध्ये थरारक क्षण! गाताना अनाचक स्टेजवर कोसळला बॉलिवूड गायक, VIDEO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धक्कादायक घटना घडली. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक गात असताना अचानक स्टेजवरच कोसळला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
लाईव्ह शोमधून गात असताना अचानक गायकाचा मृत्यू होणं, तब्येत बिघडणं अशा अनेक गोष्टी अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. 7 डिसेंबर रोजी अशीच एक घटना घडली. लाईव्ह शोमध्ये एक प्रसिद्ध बॉलिवूड गायक स्टेजवरच कोसळला. गायक कोसळताच कार्यक्रम थांबला. गायकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गायकाला नेमकं काय झालं?
एम्स भोपाळ येथे प्रसिद्ध गायक मोहित चौहानचा एक लाईव्ह शो आयोजित करण्यात आला आहे. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान धक्कादायक प्रकार घडला. गायक परफॉर्म करत असताना अचानक स्टेजवर घसरून पडला. त्यानंतर काही क्षण प्रेक्षकही स्तब्ध झाले. हा कार्यक्रम रेटिना 8.0 या स्टुडंट इव्हेंटदरम्यान आयोजित केला होता.
advertisement
गाणं गाताना झाला अपघात
गायक मोहित चौहानचा संपूर्ण शो व्यवस्थित सुरू होता. प्रेक्षकही त्याच्या गाण्यात हरवून गेले होते. रॉकस्टार सिनेमातील 'नादान परिंदे' हे फेमस गाणं तो गात होता. गाणं गात गात तो स्टेजच्या पुढे गेला आणि पुन्हा मागे आला. मागे आल्यानंतर स्टेजवरील लाईट फिक्सचरला अचानक धडक बसली आणि गायकाचा तोल गेला. गायक घसरून घाली पडला. तो पडल्याने गाणं अचानक बंद झालं आणि एकच शांतता पसरली.
advertisement
तात्काळ मिळाली वैद्यकीय मदत
हा कार्यक्रम AIIMS Bhopal या मोठ्या मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे तिथे उपस्थित असलेले मेडिकल प्रोफेशनल्स काही सेकंदातच स्टेजवर पोहोचले. आयोजक आणि ऑन-ग्राउंड स्टाफने गायकाला उचलून आराम करण्यास नेलं. डॉक्टरांनी योग्य उपचार दिल. तोवर काही वेळ कार्यक्रम थांबवण्यात आला. गायकाला चेक करण्यात आलं आणि काही वेळानं कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
advertisement
advertisement
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ
गायक मोहित चौहानसोबत घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'लवकर बरे व्हा' असं म्हणत मोहितला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान गायक मोहित चौहान याने या प्रकरणावर कोणतंही भाष्य केलेलं नाही.
गायक मोहित चौहानच्या गाण्यांबद्दल सांगायचं झाल्यास, 'साड्डा हक', 'तुम से ही', 'इलाही' यांसारखी अनेक लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला हजारो प्रेक्षक उपस्थिती लावत असतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 8:49 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये थरारक क्षण! गाताना अनाचक स्टेजवर कोसळला बॉलिवूड गायक, VIDEO व्हायरल


