पूजा बिरारीचा लांबलचक उखाणा, मंडपात सर्वांच्याच डोळ्यात आलं पाणी, सांगितली लव्हस्टोरी, बांदेकरांच्या सूनेची बातच न्यारी

Last Updated:

Pooja Birari Soham Bandekar Wedding : पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. दरम्यान पूजा बिरारीचा लग्नानंतरचा पहिला उखाणा मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

News18
News18
Pooja Birari Soham Bandekar : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी आणि महाराष्ट्राचे लाडके 'होम मिनिस्टर' अर्थात आदेश बांदेकर यांचा मुलगा, निर्माता सोहम बांदेकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नात पूजा बिरारीने एक जबरदस्त लांबलचक उखाणा घेतला आहे. तिच्या उखाण्याने उपस्थित सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एवढंच नव्हे तर पूजा-सोहमसह उपस्थित सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं. उखाणा सांगताना पूजा बिरारीने त्यांच्या लव्हस्टोरीची कहाणीच सांगितली. संपूर्ण बांदेकर कुटुंबाबद्दल पूजा वाटत असलेला जिव्हाला, प्रेम, आपुलकी ती उखाणा सांगताना स्पष्ट दिसत होती. भल्यामोठ्या बांदेकर कुटुंबातील प्रत्येकाचं नाव पूजाने आपल्या उखाण्यात घेतलं.
पूजा बिरारीने काय उखाणा घेतला?
पूजा बिरारीने उखाणा घेतला की,"घडलं सगळं अचानक, थोडी भांबावले, कळलंच नाही कसं व्हावं व्यक्त, आपसूकच या नात्यात गुंतत गेले, कारणही होतं तितकंच मस्त, एकेकाला भेटावं म्हणून माणसांची केली वाटणी, सगळ्यात आधी लौकिकला भेटले कारण म्हणे तोच आहे सोमची आद्य पत्नी. घराखाली भेटायला येतेस का म्हणून सोहमने मला गंडवलं. थेट आईसमोर नेऊन बसवलं. माझ्या मनातली हुरहुर त्यांनाही जाणवली. त्याच म्हणाल्या काही काळजी करू नकोस. मलाही कळत नाही आहे कसं व्हावं रिअॅक्ट. म्हटलं आताच एका पेजवर आहोत. आता आयुष्यभर राहु असंच. पुढे भेटले आजीला दोघी बिचाऱ्या आम्ही एकमेकींकडे नुसत्या बघतच राहिलो. भीती वाटली जाम, पटकन पाया पडले आणि सटकले तिथून. पुसला कपाळावरचा घाम".
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)



advertisement
पूजा पुढे म्हणाली,"अरे बघु तरी दे कोण आहे मुलगी असं म्हणून बाबांशी व्हिडीओ कॉलवर झालं बोलणं. त्यावेळेपासूनच मनात कोरलं गेलं त्याचं ते गोड हसणं. अगदी तुडुंब मित्रांपासून भावंडांपर्यंत, आत्या-काकांपासून मामा-मावशींपर्यंत सगळेच आहेत भन्नाट. आंबट, गोड, तिखट, चमचमीत जणू पाणीपुरी चाट. होकार देत सोहमला आपलंसं केलं घर बांदेकरांचं. आज प्रसंगी नाव घेते साऱ्यांचं. महेश काका, स्वाती काकू, प्रार्थना ताई, सायली, मैत्रीयी ताई, रोहित दादा, प्रणिता काकू, नागेश दादा, संकल्प, अस्मिता दीदी, मीरा काकू, अवधूत भाई, पराग काकू, नागेश काका, उर्वी, आभा, आक्का आजी, भाग्यश्री ताई, राज, ओकांर दादा, प्रिया मावशी, तनू दिदी, अभिषेक दादा, ज्योती मामी, निकिता, विजू आजी, पूनम काकू, सिद्देश काका, क्रिश, यासोबत संपूर्ण बांदेकर आणि गुडेकर परिवाराला एकच घालते साद आयुष्यभर असंच असुदेत प्रेम आणि पाठीशी आशीर्वाद. बांदेकरांची सून म्हणून आले तरी मुलीचं नातं असेल कायम. माझ्या आईच्या विष्णुरुपी जावयाचं आज सगळ्यांच्या समक्ष नाव घेते सोहमचं".
advertisement
पूजा आणि सोहमवर सध्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आज 2 डिसेंबर 2025 रोजी लोणावळ्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा आणि सोहमच्या डेटिंगच्या चर्चा सुरू होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
पूजा बिरारीचा लांबलचक उखाणा, मंडपात सर्वांच्याच डोळ्यात आलं पाणी, सांगितली लव्हस्टोरी, बांदेकरांच्या सूनेची बातच न्यारी
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement