वयाच्या 90 व्या वर्षी प्रेम चोप्रा गंभीर आजाराने ग्रस्त, जावयाने दिली हेल्थ अपडेट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Prem Chopra : प्रेम चोप्रा गेल्या काही दिवसांपासून हृदयाच्या गंभीर आजाराने रुग्णालयात दाखल होते. ओपन-हार्ट सर्जरी न करता त्यांचा खराब वाल्व बदलण्यात आला आहे.
Prem Chopra : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तेव्हापासून ते सतत चर्चेत होते. नोव्हेंबरमध्ये हृदयाशी संबंधित समस्येमुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरी विश्रांती घेत आहेत. या दरम्यान त्यांच्या जावयाने आणि अभिनेते शरमन जोशीने एका पोस्टद्वारे चाहत्यांना त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती दिली. शरमन जोशी यांनी प्रेम चोप्रा यांना नेमका कोणता आजार झालाय? आणि त्यावर ते कसा उपचार करत आहेत याबद्दल सांगितलं आहे.
'असा' करण्यात आला उपचार
शरमन जोशी यांनी आपल्या सोशल मीडियावर प्रेम चोप्रा यांचे रुग्णालयातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये डॉक्टरांसह अभिनेते जितेंद्रदेखील दिसत आहेत. जितेंद्र प्रेम चोप्रा यांना भेटण्यासाठी रुग्णलायात आले होते. फोटो शेअर करण्यासह शरमन यांनी सांगितलं की, प्रेम चोप्रा यांना 'एओर्टिक स्टेनोसिस' हा गंभीर आजार झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टरांनी त्यांच्यावर TAVI – Transcatheter Aortic Valve Implantation ही प्रक्रिया केली. ही एक आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पद्धत आहे, ज्यामध्ये ओपन-हार्ट सर्जरी न करता खराब झालेला वाल्व बदलला जातो.
advertisement
advertisement
डॉक्टरांचे मानले आभार
शरमन यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रेम चोप्रा यांच्या डॉक्टरांचेही मनापासून आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी लिहिलं आहे,"कुटुंबाच्या वतीने कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले आणि इंटरव्हेन्शनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. रविंदर सिंह राव यांचे आभार. या डॉक्टरांनी प्रेम चोप्रा यांच्यावर उपचार केले आहेत आणि प्रत्येक टप्प्यावर कुटुंबाला विश्वास दिला. त्यांनी हेही सांगितले की प्रक्रिया यशस्वी झाली असून प्रेम चोप्रा यांची प्रकृती आता सुधारत आहे.
advertisement
प्रेम चोप्रा वयाच्या 90 व्या वर्षीही सक्रीय
view commentsप्रेम चोप्रा हे वयाच्या 90 व्या वर्षीही चित्रपटसृष्टीत सक्रीय आहेत. सहा दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 380 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक प्रकारची पात्रे साकारली, परंतु प्रेक्षक आजही त्यांना हिंदी सिनेमातील सर्वात लक्षवेधी आणि प्रभावी खलनायक म्हणून आठवतात. या वयातही हे अभिनयक्षेत्रापासून दुरावलेले नाहीत. 2024 मध्ये आलेल्या ‘शोटाइम’ या वेबसीरिजमध्ये आणि रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते सध्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वयाच्या 90 व्या वर्षी प्रेम चोप्रा गंभीर आजाराने ग्रस्त, जावयाने दिली हेल्थ अपडेट


