रेखाला झालाय जया बच्चनचा आजार? एअरपोर्टवर लेडी फॅनला धक्का, नेटकरी संतापले VIDEO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Rekha Video Viral : दिग्गज अभिनेत्री रेखा यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रेखा सेल्फी घेण्यासाठी येणाऱ्या महिला चाहतीला धक्का देताना दिसत आहेत.
Rekha : दिग्गज अभिनेत्री आणि राजकारणी जया बच्चन सध्या चर्चेत आहेत. पापराझींना 'अनप्रोफेशनल' असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच पापराझी आवडत नसल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. खरंतर सतत फोटोसाठी उपलब्ध राहण्याचा दबाव कलाकारांवर वाढत चालला आहे. अनेकदा या विषयावर चर्चा झाली आहे. एकीकडे जया बच्चन यांचे पापराझीबद्दलचे व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसरीकडे दिग्गज अभिनेत्री रेखादेखील एका कृतीमुळे चर्चेत आल्या आहेत. रेखा यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्राचा बिघडलेला मूड स्पष्ट दिसत आहे. एअरपोर्टवर एका चाहतीने रेखाचा रस्ता अडवत सेल्फीची विनंती केली तेव्हा रेखा सेल्फी न देता सरळ त्या चाहतीला धक्का देत पुढे निघून गेली. रेखाच्या या वागणुकीवर नेटकरी संतापले आहेत. जया बच्चन यांच्यानंतर रेखा आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. रेखाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी रेखाला 'जया बच्चन 2.0' म्हणू लागले आहेत.
रेखाचा व्हिडीओ व्हायरल (Rekha Viral Video)
रेखाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये अभिनेत्री एअरपोर्टच्या एक्झिट गेटकडे जाताना दिसत आहे. दरम्यान एक महिला चाहती सेल्फी घेण्यासाठी फोन घेऊन रेखाच्या जवळ जाते. त्यावेळी रेखा तिला लगेच बाजूला करतात आणि फोटोसाठी नकार देतात. पण एअरपोर्टवरुन बाहेर गेल्यावर कारमध्ये बसण्याआधी त्या पापराझींना हात दाखवत स्माईलदेखील देतात. एअरपोर्टवर रेखा कॅज्युअल लुकमध्ये दिसल्या. यावेळी त्यांनी पांढरा टॉप, काळी ट्राउजर आणि श्रग घातला होता. रेखाचा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते त्यांची तुलना जया बच्चन यांच्याशी करू लागले आहेत. कारण जया बच्चन अनेकदा चाहत्यांना फोटो घेण्यास नकार देतात आणि पापराझींनादेखील फोटोसाठी फोझ देत नाहीत.
advertisement
advertisement
रेखाच्या या वागणुकीवर नेटकरी आणि चाहते मात्र नाराज झाले आहेत. रेखाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'जया बच्चन 2.0.', 'मला त्या महिलेसाठी वाईट वाटतंय… एखाद्या फॅनसाठी काही सेकंद देणं इतकं कठीण काय होतं?’, ‘अरे बापरे, आता जया बच्चनसारखं वागू लागल्या आहेत.’, ‘मग जया बच्चन आणि रेखा यात फरक तरी काय?’, या वयात एवढा गर्व, देवा या जया बच्चनसारखं करत आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
advertisement
रेखा यांनी बालकलाकार म्हणून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. रेखा आणि अमिताभ बच्चन ही जोडी सुपरहिट ठरली होती. रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र अनेक चित्रपटांत काम केलं आहे. यात मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, दो अनजाने, आलाप, खून पसीना, मिस्टर नटरवरलाल, सुहाग आणि राम बलराम या चित्रपटांचा समावेश आहे. रेखा सध्या रुपेरी पडद्यापासून दूर असल्या तरी वेगवेगळ्या अवॉर्ड फंक्शन आणि इव्हेंटमध्ये मात्र त्या हजेरी लावत असतात. आपल्या लूकने त्या चाहत्यांना थक्क करतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 9:26 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
रेखाला झालाय जया बच्चनचा आजार? एअरपोर्टवर लेडी फॅनला धक्का, नेटकरी संतापले VIDEO


