बिझनेसमनशी लग्न करून थेट हेमा मालिनीच्या घरी पोहोचलेली रेखा, ड्रीम गर्लने पाहताच असं काही सांगितलं की…
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hema Malini Rekha : रेखा जेव्हा आपल्या पती मुकेश अग्रवाल यांना घेऊन हेमा मालिनींच्या घरी पोहोचली होती, तेव्हा ड्रीम गर्लने रेखाला अशी काही गोष्ट सांगितली होती, जी रेखाच्या कल्पनेतही नव्हती.
Hema Malini Rekha : हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेत्री रेखा आणि हेमा मालिनी यांच्याशी संबंधित असा एक किस्सा नुकताच समोर आला आहे. दोन्ही अभिनेत्रींना आयुष्यभर अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. रेखाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक वादळे आली आणि आज ती एकटीच आयुष्य जगत आहे. दुसरीकडे हेमा मालिनी आहेत. ज्यांनी विवाहित धर्मेंद्र यांच्याशी लग्न केले होते. ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या पहिल्या वैवाहिक आयुष्यात मोठा गोंधळ झाला होता. किस्सा असा आहे की बिझनेसमन मुकेश अग्रवालशी लग्न केल्यानंतर रेखा थेट आपली खास मैत्रीण हेमा मालिनीच्या घरी पोहोचली होती. त्या वेळी धर्मेंद्र देखील घरी होते.
लग्न करून रेखा थेट हेमा मालिनीच्या घरी पोहोचली
4 मार्च 1990 रोजी मुकेश मुंबईत रेखाला भेटायला गेले होते आणि तिथेच त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली. रेखाही लग्नासाठी तयार झाली. लग्नानंतर मुकेश, रेखाला घेऊन अभिनेत्री दीप्ती नवल यांच्या घरी जाऊ इच्छित होते. परंतु रेखा तिकडे जायला तयार नव्हती. त्यानंतर दोघांनी साधेपणाने जूहू येथील एका मंदिरात लग्न केले.
advertisement
लग्नानंतरही मुकेश रेखाला दीप्ती नवल यांच्या घरी घेऊन जायचे म्हणत होते, पण रेखा आपली मैत्रीण हेमा मालिनींच्या घरी जायला इच्छुक होती. कारण रेखा आणि हेमा दोघीही दक्षिण भारतातून आलेल्या अभिनेत्री असल्याने एकमेकींच्या खूप खास होत्या.
हेमा मालिनींची रिअॅक्शन काय होती?
मुकेश यांनी पत्नी रेखाची इच्छा मान्य केली आणि ते हेमा मालिनींच्या घरी गेले. हेमा मालिनीची नजर जशी मुकेश यांच्यावर पडली तसं त्यांनी लगेचच रेखाला सांगितलं की,आता हे सांगू नकोस की तू या माणसाशी लग्न केलं आहेस.”.त्यावर रेखाने होकार दिला. मग हेमा म्हणाल्या,“तो खूप श्रीमंत आहे का?” पण रेखाने या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
advertisement
लग्नाच्या फक्त आठ महिन्यांनंतरच मुकेश यांनी आत्महत्या केली. तेव्हा रेखा लंडनमध्ये होती आणि त्यांच्या पतीच्या मृत्यूला लोकांनी रेखालाच जबाबदार धरले. मात्र रेखाचं म्हणणं होतं की मुकेश यांनी आत्महत्या केल्याचा तिला मोठा धक्का बसला आणि ते असे काही करू शकतील यावर तिला विश्वासच बसत नव्हता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 1:14 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिझनेसमनशी लग्न करून थेट हेमा मालिनीच्या घरी पोहोचलेली रेखा, ड्रीम गर्लने पाहताच असं काही सांगितलं की…


