'हे प्रेम असंच राहिल...', दुसऱ्या लग्नानंतर 'त्या' व्यक्तीसाठी समंथाची स्पेशल पोस्ट, हृदयस्पर्शी मेसेज वाचून डोळे पाणावतील
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Samantha Ruth Prabhu Wedding: दुसऱ्या लग्नानंतर समंथाने लिहिलेली एक खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीची 'क्वीन' आणि 'द फॅमिली मॅन' फेम अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे जोरदार चर्चेत आहे. सिरीजचे सह-दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर, समंथाने लिहिलेली एक खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमधून संबंधित व्यक्तींबद्दलचे भावनिक नाते जगासमोर आणले आहे.
राजसोबत दुसऱ्या इनिंगला सुरुवात
२०२१ मध्ये अभिनेता नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतल्यानंतर समंथाने आता राज निदिमोरू यांच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. 'द फॅमिली मॅन २' सिरीजच्या चित्रीकरणानंतरच समंथा आणि राज यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण दोघांनीही याबाबत कोणतेही भाष्य केले नव्हते. अखेर, सोमवारी १ डिसेंबर रोजी एका पोस्टद्वारे त्यांनी आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा केली.
advertisement
समंथा आणि राज या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. समंथाने २०२१ मध्ये नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतला होता, तर राज निदिमोरू यांनीही २०२२ मध्ये श्यामाली डे यांच्याशी घटस्फोट घेतला होता.
'डेस्परेट लोक...', इथे समांथा-राजचं लग्न, तिथे पहिल्या पत्नीची क्रिप्टिक पोस्ट! कोणावर साधला निशाणा?
लाडक्या बहिणींसाठी लिहिली खास पोस्ट
मंगळवारी समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या बहिणींचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्यांच्यासाठी एक हृदयस्पर्शी संदेश लिहिला. तिने लिहिले, "माझ्या प्रिय बहिणींनी मला नेहमीच खूप काही शिकवले आहे आणि आजही त्या मला एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी मार्ग दाखवत राहतात. माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुमच्यावर खूप प्रेम करते आणि हे प्रेम नेहमीच कायम राहील," अशा शब्दांत समंथाने आपले प्रेम व्यक्त केले आहे. नव्या संसाराला सुरुवात करताना तिने आपल्या कुटुंबाला दिलेले हे महत्त्व तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे.
advertisement

मॉडलिंग ते देशातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या समंथाने आपल्या मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. २०१० मध्ये तमिळ चित्रपट 'विन्नैथांडी वरुवाया' मधून तिने पदार्पण केले. त्यानंतर 'थेरी', 'जनता गॅरेज', 'अ आ' यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच्या मनात खास ओळख निर्माण केली.
advertisement
'फॅमिली मॅन २' सिरीजमधून तिने हिंदी वेब सिरीजच्या जगात दमदार पाऊल ठेवले. सध्या ती वरुण धवनसोबत 'सिटाडेल हनी बनी' या सिरीजमध्येही महत्त्वपूर्ण भूमिकेत काम करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 02, 2025 9:40 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'हे प्रेम असंच राहिल...', दुसऱ्या लग्नानंतर 'त्या' व्यक्तीसाठी समंथाची स्पेशल पोस्ट, हृदयस्पर्शी मेसेज वाचून डोळे पाणावतील


