Shah Rukh Khan : धडकी भरवणारी नजर, खतरनाक सस्पेन्स; शाहरुखच्या वाढदिवशी KING चा फर्स्ट लूक आऊट

Last Updated:

Shah Rukh Khan KING Title Reveal : शाहरुख खानने आज आपल्या 60 व्या वाढदिवशी आगामी KING चित्रपटाची घोषणा करत त्याचा फर्स्ट लूक आऊट केला आहे.

News18
News18
Shah Rukh Khan KING Title Reveal : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan Birthday) आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखच्या वाढदिवशी आज त्याच्या आगामी 'KING' या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली झलक आऊट करण्यात आली आहे. धडकी भरवणारी नजर, भडक अॅक्शन, खतरनाक सस्पेन्स, असा काहीसा शाहरुखचा 'KING'चित्रपटातील फर्स्ट लूक आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘किंग’चा टायटल रिवील व्हिडिओ शेअर केला आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्सच्या बॅनरअंतर्गत निर्मिती करण्यात आलेला ‘किंग’ हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात शाहरुख खानचं कधीही न पाहिलेलं रूप पाहायला मिळणार आहे. किंग खानच्या संपूर्ण जगभरातील चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.
'KING' हा चित्रपट एक स्टाइलिश आणि जबरदस्त ऍक्शन एंटरटेनर आहे, जो स्टाइल,आणि थ्रिल नव्या पद्धतीने सादर करेल. सिद्धार्थ आनंदचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि मसालेदार चित्रपट मानला जात आहे, जो त्याच्या ऍक्शन स्टोरीटेलिंगला एका नव्या स्तरावर नेईल.












View this post on Instagram























A post shared by Siddharth Anand (@s1danand)



advertisement
‘किंग’चं टायटल रिवील करत शाहरुख खानच्या वाढदिवसाची दणक्यात सुरुवात करण्यात आली आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदकडून फर्स्ट लूक आऊट करत चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट देण्यात आलं आहे. शाहरुखला किंग खान म्हटलं जातं. आता याच नावाचा चित्रपट घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटातील त्याचं पात्र फक्त भीती निर्माण करत नाही, तर दहशत पसरवतं. “शंभर देशांत बदनाम, जगाने दिलं फक्त एक नाव” – ‘किंग’ हा त्याचा चित्रपटातील डायलॉग प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
advertisement
शाहरुख खान खरोखरं “दिलों के बादशाह”आहे. चित्रपटातील शाहरुखचा लुक खूपच खतरनाक आहे. चंदेरी केस, ईयररिंग्स आणि यापूर्वी कधीही न पाहिलेला स्टायलिश अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘किंग’ हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shah Rukh Khan : धडकी भरवणारी नजर, खतरनाक सस्पेन्स; शाहरुखच्या वाढदिवशी KING चा फर्स्ट लूक आऊट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement